Join us

कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:00 IST

Sugarcane Nursery शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात.

शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात.

सध्या शेतकरी बेणेएवजी एक डोळा रोप लागणीस प्राधान्य देताना दिसून येत आहे, कारण रोपाद्वारे लागण केल्यास बियाणे खर्चात व लागण खर्चात बचत होऊन किमान एक महिना वेळेमध्ये बचत होते.

ऊस रोपे निर्मितीसाठी गादी वाफा पध्दत◼️ यासाठी १ मीटर रूंदीचे व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत.◼️ गादी वाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टीक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथरून घ्याव्यात.◼️ चांगले कुजलेले शेणखत व मातीचा मिश्रणाच्या सहा इंच जाडीचा थर द्यावा.◼️ यानंतर बुरशीनाशक व किटकनाशकाची बेणे प्रक्रिया केलेल्या दोन इंचाच्या एक डोळा कांड्या घ्याव्यात.◼️ एक ते दोन इंच कांडीतील अंतर व दोन ओळीतील अंतर एक इंच याप्रमाणे मांडणी करावी.◼️ दोन ते अडीच सें.मी. मातीचा थर वर दिल्यास अर्ध्या गुंठा क्षेत्रा (५० चौ.मी.) मध्ये एक हेक्टरला पुरतील एवढे रोपे तयार होतात.◼️ रोपे काढताना गादी वाफ्यास पाणी देवून रोपे काढल्यास मुळ्या तुटत नाहीत आणि सुकत नाहीत.◼️ काढलेल्या रोपांची लागवड लवकर केल्यास रोपे मरीचे प्रमाण कमी होते.◼️ यासाठी खर्चसुध्दा कमी येऊन बेणे वाहतुकीचा खर्च कमी होतो.

अधिक वाचा: नर्सरीमधून फळांची रोपे खरेदी करताना त्यांची निवड कशी करावी? लागवड कशी करावी? वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसलागवड, मशागतशेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापन