गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.
पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते.
पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत.
हिरवा मोझॅक रोगाची लक्षणे
◼️ यामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात.
◼️ पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते.
◼️ हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे
◼️ सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.
◼️ त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.
◼️ काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.
◼️ लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते.
◼️ हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटपाचा दावा कसा दाखल करावा? काय काळजी घ्यावी?