Lokmat Agro >स्मार्ट शेती > उत्पादन वाढविण्यासाठी सुरू उसाची शास्त्रीयदृष्ट्या लागवड कशी करावी?

उत्पादन वाढविण्यासाठी सुरू उसाची शास्त्रीयदृष्ट्या लागवड कशी करावी?

How to cultivation of seasonal suru sugarcane scientifically to increase production? | उत्पादन वाढविण्यासाठी सुरू उसाची शास्त्रीयदृष्ट्या लागवड कशी करावी?

उत्पादन वाढविण्यासाठी सुरू उसाची शास्त्रीयदृष्ट्या लागवड कशी करावी?

सुरू उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान केली जाते. सुरू उसाच्या अधिक उत्पादनासाठी शास्त्रीयदृष्ट्या लागवड करणे गरजेचे आहे. पूर्वमशागत, जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्टरी २० टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे.

शेअर :

Join us
Join usNext

सुरू हंगामासाठी वाण शेतकऱ्यांनी सुरू ऊस लागणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले मध्यम पक्वता वर्गातील को ८६०३२ (निरा), फुले २६५, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ व लवकर पक्वता गटातील फुले १०००१ आणि फुले ११०८२ या वाणांची निवड करावी. हेक्टरी २५,००० टिपरी बेणे लागते. दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांची लागवड करताना दोन टिपऱ्यामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून डोळे बाजूस येतील अशा प्रकारे लागवड करावी. रोपांची लागवड करताना दोन ओळीतील अंतर ४ फूट व दोन रोपातील अंतर २ फूट ठेवल्यास एकरी ५५५५ रोपे लागतात.

अधिक वाचा: उसाचे उत्पादन वाढवायचं; आंतरपीक म्हणून घ्या भुईमूग

ऊस बेणे प्रक्रिया
कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच बुरशीच्या बंदोबस्तासाठी मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही ३०० मि.ली. कोर्बेन्डझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर १० किलो अॅसेटोबॅक्टर व १.२५ किलो स्फुरद विरघळवणारे जीवाणू १०० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणामध्ये बेणे ३० मिनिटे बुडवावे. जिवाणूंच्या बीज प्रक्रियेमुळे नत्रामध्ये ५० टक्के तर स्फुरदच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.

सुरू ऊस लागवडीचे अंतर
भारी जमिनीत १२० किंवा १५० सें.मी. व मध्यम जमिनीत १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. 

रासायनिक खत व्यवस्थापन
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगनीज सल्फेट व ५ किलो बोरॅक्स, ५० ते १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

डॉ. पी.जी.पाटील
कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी

Web Title: How to cultivation of seasonal suru sugarcane scientifically to increase production?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.