Join us

नर्सरीमधून फळांची रोपे खरेदी करताना त्यांची निवड कशी करावी? लागवड कशी करावी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:40 IST

Falbag Lagwad रोपवाटिकेतून फळांची रोपे घेताना त्यांची निवड कशी करावी? तसेच नवीन रोपांची/कलमांची लागवड कशाप्रकारे करायची हे सविस्तर पाहूया.

फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राज्यात आतापर्यंत ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत.

रोपवाटिकेतून फळांची रोपे घेताना त्यांची निवड कशी करावी? तसेच नवीन रोपांची/कलमांची लागवड कशाप्रकारे करायची हे सविस्तर पाहूया.

कलमांची निवड कशी कराल?◼️ फळबागांपासून काही वर्षाच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्‌या परवडत नाही.◼️ फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते आणि म्हणून फळपिकाच्या वागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहित असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी.◼️ शक्य असल्यास रोपे फक्त कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून खरेदी करावीत.◼️ शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे/रोपे घ्यावीत.◼️ खरेदी केलेल्या रोपांची पक्की पावती घ्यावी.◼️ कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृ-वृक्षापासून केलेली आहेत कि नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे.◼️ रोपे घेताना कलम बांधलेली आहेत व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी.◼️ त्याचबरोबर ती वाढीला जोमदार आहेत निरोगी आहेत, आपणास पाहिजे त्याच जातीची आहेत याची खात्री करूनच खरेदी केली पाहिजेत.

नवीन रोपांची/कलमांची लागवड कशी करावी?◼️ लागवड करण्यापूर्वी प्रथम कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग अलगद काढावी.◼️ मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेऊन हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी.◼️ अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय किंवा वजन पडणार नाही याची काळजी घ्यावी.◼️ आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे आधारासाठी पश्चिम बाजूत ६ इंच अंतरावर ४ ते ५ फुट बांबूची काठी रोवून त्याला कलम बांधावे.

अधिक वाचा: फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतकरीशेतीलागवड, मशागतविद्यापीठसरकार