Join us

डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज? पहा सविस्तर वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:35 IST

डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

डाळिंबात फळे तडकणे ही समस्या पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळेच दिसते. आपण डाळिंब पिकातील पाणी व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

डाळिंब लागवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वयोगटात पाण्याची आवश्यकता भिन्न असते. वाढीच्या अवस्था व वयानुसार पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते.

कसे कराल पाणी व्यवस्थापन?१) पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणचा बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन करावे.२) पाणी पुरवठा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करणे आवश्यक आहे.३) ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी पुरवठा करीत असतांना दररोज किंवा एक दिवसाआड संच न चालवता जमिनीत वाफसा आल्यानंतर संच चालविणे योग्य आहे.४) खालील तक्त्यानुसार झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी द्यावे.५) झाडाचा पसारा मोठा असल्यास दोन ऐवजी चार ड्रिपरचा वापर करावा.६) ड्रिपर झाडाच्या पसाऱ्याच्या ६ इंच बाहेर असावेत.७) ड्रिपरमधुन योग्य त्या प्रमाणात पाणी पडते किंवा नाही याची खात्री करावी.८) पाण्यात बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय किंवा पॉलिथिलीन आच्छादनाचा वापर करावा.

कोणत्या महिन्यात किती पाणी लागते?

महिनापाणी मात्रा लि./झाड 
जानेवारी१७
फेब्रुवारी१८
मार्च३१
एप्रिल४०
मे४४
जून३०
जुलै२२
ऑगस्ट२०
सप्टेंबर२०
ऑक्टोबर१९
नोव्हेंबर१७
डिसेंबर१६

अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

टॅग्स :डाळिंबपाणीशेतकरीशेतीपीकफळेफलोत्पादन