Join us

ह्या पाच गोष्टी पाळा अन् बाजारात तुमच्या कापसाला सर्वाधिक भाव मिळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:46 IST

कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसास योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते.

कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसास योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते.

प्रतवारी म्हणजे उत्पादित मालाचे ठरवून दिलेल्या गुण वैशिष्ट्यांच्या आधारावर त्याचे विभिन्न गट करणे होय. कपाशीची प्रतवारी सादृश्य पध्दतीने केली जाते.

सर्वसाधारणपणे कपाशीची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असते.

त्यामुळे संकलन केंद्रावर प्रतवारी, मोजमाप व प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण होत असतात म्हणून सादृश्य पद्धतीनेच प्रतवारीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येत होते.

पण आता नविन तंत्रज्ञानामुळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुणवैशिष्ट्यांनुसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे चांगल्या प्रतवारी असलेला मालाला योग्य भाव मिळतो.

कापसाची प्रत कशावरून ठरविली जाते?१) कापसाचा रंगप्रत्येक वाणाच्या कपाशीस विशिष्ठप्रत हलकी असल्यास किंवा पावसाने कापूस भिजला गेल्यास त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीस त्या वाणाचा मुळ रंग दिसून येतो. कापसाची होतो त्यामुळे रूईमध्ये लाल पिवळसर रंगाची रूई आढळल्यास अशा रूईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो. 

२) कापसाची स्वच्छताकपाशीची वेचणी करताना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशाप्रकारच्या विक्रिस आणलेलया कपाशीमध्ये झाडाची पत्ती, पालपाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतिवर परिणाम होतो.

३) तंतूची लांबीसर्वसाधारणपणे कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रूईतील थोडा भाग घेवून हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ट उपकरणांव्दारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. परंतू विक्रिस मोठ्या प्रमाणात असलेल्या कापसाच्या तंतूची लांबी काढण्यासाठी प्रत्येक गाडीतील कापूस गलाई करून त्याची लांबी काढणे शक्य होत नसते. म्हणून विक्रीस आणलेल्या कापासातील काही कापूस एका हातात घेवून दुसऱ्या हाताने ओढून कापसातील रूई सरकीपासून वेगळी केली जाते. विशिष्ट पातळीवर धाग्याची समानता आल्यानंतर धाग्याच्या लांबीचा अंदाज घेण्यात येत होता परंतू आता प्रयोगशाळेत नविन आलेल्या उपकरणाव्दारे धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो.

४) तंतूची ताकदविक्रिस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेउन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतूना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशाप्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कपासातील परिपक्व व अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतूंच्या लांबीप्रमाणे तंतूच्या ताकदीवर भर देण्यात येतो. 

५) कापसाच्या तंतूची परिपक्वताविक्रीस आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरिपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रूईचे प्रमाण अवलंबून असते व रूईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रूईचे प्रमाण अधिक असते.

अधिक वाचा: साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर

टॅग्स :कापूसकाढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनशेतीबाजारमार्केट यार्ड