ई-पीक पाहणी ही राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक नवीन आणि डिजिटल पद्धत आहे ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई पीक पाहणी अँप च्या सहाय्याने स्वतः करू शकतात.
यापूर्वी पिकांची नोंदणी तलाठी या सरकारी अधिकाऱ्याद्वारे करण्यात येत होती. मात्र, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि मोबाईल अॅप च्या सहाय्याने पार पाडली जाते.
ई पीक पाहणीमध्ये आपण शेतातील विविध घटकांची नोंद करू शकतो त्यात आपल्या शेताच्या बांधावरील झाडांचीही नोंद करता येते. ई पीक पाहणी अॅप च्या सहाय्याने बांधावरची झाडे नोंदवतात ते पाहूया.
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल व E-Pik Pahani ई-पीक पाहणी (DCS) अॅप Install करायचा आहे.
- अॅप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Photo आणि Media च्या Access साठी Permission मागेल त्यासाठी Allow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या Mobile च्या Location साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला फोटो आणि विडिओ साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
- तुमच्या विभागाची निवड केल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवड मध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा (जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करून तो बदलून घ्या.)
- आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे. (जर तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असाल तर सांकेतांक विसरलास? वर क्लिक करा तुम्हाला तुमचा सांकेतांक दिसेल.)
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला बांधावरची झाडे नोंदवा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि Right Arrow बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल ती अचूक असल्याची खात्री करायची आहे व सर्व माहिती अचूक असल्यास पुढे बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमची माहिती अपलोड झाल्याचा एक मेसेज दिसेल (झाडांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे.) त्यामध्ये ठीक आहे वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्ही बांधावरच्या झाडांची भरलेली माहिती पाहू शकता किंवा त्यामध्ये बदल करू शकता किंवा ती नष्ट करू शकता.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना पिकाचा असा फोटो काढणे बंधनकारक; वाचा सविस्तर