Lokmat Agro >स्मार्ट शेती > Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?

Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?

Dasta Nondani : If there is a mistake in the registered document, how can it be corrected? Read in detail? | Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?

Dasta Nondani : नोंदणी झालेल्या दस्तात चूक झाली तर ती कशी दुरुस्त करता येते? वाचा सविस्तर?

शेतजमीन खरेदी-विक्री तसेच रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज असतात. ज्यामुळे किरकोळ चुका होऊ शकतात.

शेतजमीन खरेदी-विक्री तसेच रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज असतात. ज्यामुळे किरकोळ चुका होऊ शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

शेतजमीन खरेदी-विक्री तसेच रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज असतात. ज्यामुळे किरकोळ चुका होऊ शकतात. तथापि, या त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्तऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देऊ शकतात.

दुरुस्ती विलेख खरेदीदार आणि विक्रेत्यांना मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये अशा त्रुटी दूर करण्याची सुविधा दुरुस्ती विलेख देतो. शब्दलेखन चुका, टायपिंग चुका, पुनरावृत्ती, संख्यात्मक चुका, जटिल वाक्यरचना हे यात प्राधान्याने दुरुस्त केले जाते.

दुरुस्ती विलेख करायची असेल तर मूळ मालकाच्या तपशिलांसह दुरुस्ती विलेखांमध्ये व्यवहारात सहभागी असलेल्या पक्षांची माहिती समाविष्ट असावी.

दुरुस्त करणे आवश्यक असलेल्या त्रुटीदेखील नमूद केल्या पाहिजेत. याशिवाय विक्री कराराच्या मूळ स्वरूप आणि वर्णनात कोणतेही बदल केले गेले नाही असे दोन्ही पक्षांना हमीपत्र देणे आवश्यक आहे.

दुरुस्ती विलेखाची नोंदणी करण्यासाठी विलेखांमध्ये सामील झालेल्या दोन्ही पक्षांनी प्रस्ताव बदलांवर सहमती दर्शविली पाहिजे. मागील मालकांचे निधन झाले असेल तर काही चुका दुरुस्ती करण्यासाठी कायदेशीर वारस उपयुक्त ठरतात.

याविषयी 'लोकमत'शी बोलताना अॅड. माधुरी प्रभुणे म्हणाल्या, कोणत्याही पक्षाला विक्री करारामध्ये त्रुटी आढळल्यास विलेख नोंदणीकृत आहे त्या उपनिबंधक कार्यालयातील व्यक्तीसह हजर राहणे बंधनकारक आहे.

सर्व सहायक दस्तऐवजांसह त्यांना दस्तऐवजात दुरुस्त्या करण्यासाठी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. मूळ दस्तऐवजात मोठे बदल आवश्यक असल्यास दोन्ही पक्षांना दोन साक्षीदार देणे गरजेचे आहे.

प्रगती जाधव-पाटील
उपसंपादक, लोकमत

अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?

Web Title: Dasta Nondani : If there is a mistake in the registered document, how can it be corrected? Read in detail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.