Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

crops are being protected by AI, farmers' income is increased by apps | उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

उभ्या पिकांचे होतेय AI मुळे संरक्षण, ॲपमुळे शेतकऱ्यांच्या कमाईत भर

उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञान...

उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञान...

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आता पिकांचे रोगराईपासून संरक्षण करण्यासाठीही वापर होऊ लागला असून, त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कीटकनाशकांवर होणारा खर्चही घटल्याचे दिसून आले आहे.

यासाठी बनविलेल्या अॅपबाबत वाधवानी एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शिवसुब्रमण्यम म्हणाले की, आम्ही उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान पुरवतो. कंपनीचे 'कॉटन एस अॅप' शेतकऱ्यांना किडींची ओळख पटवून उपाय सुचवते. याच्या वापराने शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

खर्चात मोठी घट

पिकांच्या संरक्षणासाठी एआयच्या सहाय्याने तयार केलेल्या केलेल्या अॅपमुळे शेतकऱ्याचा नफा २० टक्के वाढला तर कीटकनाशकांवर होणारा खर्च २५ टक्के घटल्याचे समोर आले आहे.

कंपनीला २७.४२ कोटी रुपयांचे अनुदान

या उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी गुगल डॉट ओआरजीने पुढाकार घेतला असून वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला ३३ लाख डॉलर म्हणजेच सुमारे २७.४२ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून तांदूळ, गहू आणि मका या पिकांना एआयचे संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे.

Web Title: crops are being protected by AI, farmers' income is increased by apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.