Lokmat Agro >स्मार्ट शेती > बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

Control the humani insect by doing this trick with a battery-operated spray pump; know the details | बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

humani niyantran jugad सामुहिक प्रयत्न कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

humani niyantran jugad सामुहिक प्रयत्न कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सामुहिक प्रयत्न कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.

वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बांधाशेजारच्या बाभूळ, कडुनिंब, चिंच, बोर आदी झाडांवर गोळा होतात.

भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळी जमिनीतून वर मिलनासाठी बाहेर पडतात. मादी भुंगेरे अगोदर मातीबाहेर येतात. सूर्योदयापूर्वी ते परत जमिनीत जाऊन लपतात.

हुमणीच्या भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे सौरऊर्जा व विजेवर कार्यान्वित होणारे प्रकाशसापळे बाजारात उपलब्ध आहेत. त्यासाठी साधारणतः दीड हजार रुपये मोजावे लागतात.

घरच्या घरी कसा बनवाल प्रकाश सापळा?
◼️ कमी खर्चात प्रकाश सापळा तयार करु शकतो.
◼️ यासाठी बॅटरी चलीत फवारणी पंप, १२ वॉटचा एलईडी बल्ब, होल्डर, रिकामी प्लॅस्टिक बरणी, निकामी चार्जरची प्लगपिनसह आवश्यकतेनुसार वायर, प्लास्टिक अथवा लोखंडी घमेले, खराब इंजिन ऑईल, किटकनाशक व पाणी लागते.
◼️ बरणीच्या झाकणाला आतून होल्डर बसवून मागील बाजूस दोन छिद्रांतून दोन्ही वायर बाहेर काढाव्यात.
◼️ चार्जरच्या वायरला त्या जोडून घ्याव्यात.
◼️ शेताजवळ टांगलेल्या या बल्बच्या खाली घमेल्यातील पाण्यात इंजिन ऑईल किंवा कीटकनाशके टाकून बॅटरी पंप सुरु करावा.
◼️ सायंकाळी बाहेर पडलेले भुंगेरे या प्रकाशाकडे आकर्षित होऊन घमेल्यात पडून मृत होतात आणि हुमणी अळीचा नाश होतो.

अधिक वाचा: Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: Control the humani insect by doing this trick with a battery-operated spray pump; know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.