Join us

Chia Seeds: चिया बियांचे असे आहेत चमत्कारी फायदे वाचा सविस्तर

By प्रतीक्षा परिचारक | Updated: May 9, 2025 15:40 IST

Chia Seeds : आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, ही चिया बी (Chia Seeds) केवळ उर्जादायक नाही, तर अनेक आजारांपासून संरक्षण करणाऱ्या 'सुपरफूड'पैकी एक आहे. जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तरी काय वाचा सविस्तर (Chia Seeds)

सध्या आरोग्यसाक्षरता वाढल्यामुळे जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. शरीरसंपत्ती वाढवणे, मानसिक शांतता राखणे आणि विविध रोगांपासून संरक्षण करणे यासाठी अन्नघटकांचे योग्य प्रमाण आणि गुणवत्ता महत्त्वाची ठरते. अशाच पोषणदृष्ट्या समृद्ध घटकांमध्ये चिया बिया (Chia Seeds) या अलीकडे विशेष लोकप्रिय झाल्या आहेत.

आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, ही चिया बी (Chia Seeds) केवळ उर्जादायक नाही, तर अनेक आजारांपासून संरक्षण करणाऱ्या 'सुपरफूड' पैकी एक आहे. त्याचे आरोग्यदायी काय आहेत फायदे ते जाणून घ्या सविस्तर (Chia Seeds)

* ऊर्जा वाढवणारे नैसर्गिक टॉनिक

चिया बियांमध्ये प्रथिने, चांगले चरबीयुक्त आम्ल (ओमेगा-३), फायबर आणि आवश्यक खनिजांनी युक्त आहेत. यामुळे याचे सेवन केल्यावर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान होते. काहींच्या मते, चियाचा एक चमचा घेतल्यास २४ तास काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळू शकते.

* हृदयासाठी वरदान

चियामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात, रक्तदाब कमी करतात आणि सूज नियंत्रणात ठेवतात. या सर्व घटकांचा एकत्रित प्रभाव हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्यामुळे कार्डिओव्हास्कुलर आरोग्यासाठी हे बियाणे अत्यंत फायदेशीर आहेत.

* अँटी-एजिंग आणि त्वचेसाठी उपयुक्त

चिया बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. त्यामुळे सुरकुत्या उशिरा येतात, त्वचेचा नूर टिकतो आणि अकाली वृद्धत्वाला थांबवता येते.

* मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रण

चिया बियांमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबरचे उच्च प्रमाण असते. हे फायबर रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होतो.

* पाचन आरोग्य आणि डिटॉक्स

चिया पाण्यात भिजवले असता जिलेटीनस जेली तयार करते. ही रचना आतड्यांत प्रीबायोटिक म्हणून काम करते, जी चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते. फायबरच्या भरपूर प्रमाणामुळे पचनक्रिया सुधारते, जळजळ कमी होते आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात.

* वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे घटक

चिया बिया पाण्याचे शोषण करून पोटात फुगतात आणि पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी होते आणि जेवणात अतिसेवन टाळले जाते. वजन कमी करण्यासाठी इच्छुकांसाठी हे एक नैसर्गिक उपाय ठरतो.

* संधिवात व वेदनांवर आराम

चियातील ओमेगा-३ चरबीमुळे सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते. विशेषतः संधिवात असलेल्या रुग्णांनी याचे नियमित सेवन केल्यास दीर्घकालीन आराम मिळतो,

* मेंदूचा विकास आणि स्मरणशक्तीस मदत

EPA आणि DHA हे दोन अत्यावश्यक फॅटी अ‍ॅसिड्स चियामध्ये आढळतात. हे मेंदूतील न्यूरॉन पेशींच्या कार्यक्षमतेस मदत करतात. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.

* कर्करोगापासून संरक्षणाची शक्यता

प्राण्यांवर झालेल्या प्रयोगांमधून असे दिसून आले आहे की, चिया बिया काही प्रकारच्या कर्करोगास प्रतिबंध करण्याची क्षमता ठेवतात. तरीही या बाबतीत अजून अधिक मानवी संशोधनाची गरज आहे.

* विटामिन बीमुळे केसांचे आरोग्य सुधारते

चियामध्ये उपस्थित विटामिन बी केसांच्या वाढीस चालना देतो. त्यामुळे केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी राहतात.

* चिया बियांचे औद्योगिक व आहारातील उपयोग

चियामधील डिंक व म्युसिलेज गुणधर्मांमुळे अन्न उद्योगात त्याचा वापर वाढत आहे. ब्रेड, पास्ता, बिस्किटे, केक अशा बेकरी उत्पादनांत त्याचा समावेश केला जातो.

चिया जेल अंड्याला पर्याय म्हणून वापरले जाते, विशेषतः शाकाहारी (व्हेगन) लोकांसाठी उपयुक्त आहे.

सीएफटीआरआयसारख्या संस्थांनी चिया-मिश्रित आईस्क्रीम, जॅम, चॉकलेट सारखी उत्पादने विकसित केली आहेत.

चिया तेल ही ओमेगा-३ ची सुलभ, स्वस्त आणि सुरक्षित पर्याय आहे. जो सूर्यफूल, मोहरी, ऑलिव्ह तेलांपेक्षा अधिक फायदेशीर आहे.

* आरोग्य आणि पोषण असलेले 'चिया'

आजच्या घडीला अनेक आजारांचे मूळ हे अयोग्य आहारात आहे. चिया बियाण्यांचे नियमित सेवन केल्यास मधुमेह, हृदयविकार, पचनाचे विकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांपासून नैसर्गिक बचाव मिळतो.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात चिया पिकाची यशस्वी लागवड झाल्यामुळे केवळ आरोग्य सुधारण्यापुरतेच नव्हे, तर आर्थिक स्थैर्य, कृषी विकास आणि निर्यातीसाठीही मोठी संधी उपलब्ध होताना दिसत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chia Pik: जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय?

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआरोग्यहेल्थ टिप्सलागवड, मशागत