Chia Pik : बदलत्या हवामानात आणि शेतीतील वाढता खर्च आणि उत्पादनातील घट या सर्व बाबींचा विचार करता कमी खर्चात अधिक नफा देणारे पिक म्हणजेच चिया आहे. (Chia Pik)
या पिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चिया पीक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरला आहे. आज आपण चिया लागवड करण्यासाठी योग्य हवामान, जमीन आणि लागवड तंत्रज्ञान (cultivation technique) या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (Chia Pik)
चिया (Chia) लागवड म्हणजे साल्व्हिया हिस्पॅनिका (Salvia hispanica) या वनस्पतीची लागवड (cultivation technique) करणे. बदलत्या हवामानात आणि शेतीतील वाढता खर्च आणि उत्पादनातील घट या सर्व बाबींचा विचार करता कमी खर्चात अधिक नफा देणारे पिक म्हणजेच चिया आहे. (Chia Pik)
या पिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. चिया पीक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरला आहे. रब्बी हंगामात चांगले उत्पादन आणि बाजारात चांगला दर मिळवून देणारे असे पीक आता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Chia Pik)
जमीन कशी लागते? (cultivation technique)
चिया वनस्पती मातीच्या विविध परिस्थितीशी अतिशय जुळवून घेते. या पिकास जमीनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असलेल्या मध्यम, काळीभोर जमीन, पाण्यायचा उत्तम निचरा होणारी जमीन चिया लागवडीसाठी योग्य असते. मातीची पोषक स्थिती व पीएच पातळी निश्चित करण्यासाठी त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. चाचणीच्या निकालाच्या आधारे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य खते देता येतात.
कसे हवामान लागते?
चिया वनस्पती ही उष्णकटिबंधीय हवामानात वाढते. समुद्र सपाटीपासून ४०० मीटर ते २५०० मीटर उंचीपर्यंत लागवड करता येते. समुद्रसपाटीपासून २०० मीटर पेक्षा कमी उंचीचा भाग चिया लागवडीसाठी योग्य नसतो.
महाराष्ट्रात कोकणातील समुद्राजवळील भाग वगळता इतर भागात चिया पिकाची लागवड केली जाऊ शकते. या वनस्पतीला मध्यम प्रमाणात पावसाची आवश्यकता असते.
चियाला उष्ण आणि दमट हवामान आवडते. सरासरी तापमान २० ते ३० अंश सेल्सियस तापमान सर्वोत्तम मानले जाते.
लागवडीचा हंगाम कोणता?
महाराष्ट्रात चिया लागवडीसाठी रब्बी हंगाम योग्य असून त्याची लागवड १ ऑक्टोबर पासून ते १५ डिसेंबर पर्यंत करता येते. पिकाच्या वाढीसाठी आणि बियाणे उत्पादनासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक आहे. चिया हे कमी कालावधीचे पीक असल्यामुळे पावसाळ्यात चिया बियाणे ओले होवून नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे हे पीक खरीप हंगामात घेतले जात नाही.
जमिनीची पूर्व मशागत कशी करावी ?
* कोणतेही तण किंवा कचरा काढून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुमारे ८ ते १० इंच खोली पर्यंत जमीनीची वखरणी किंवा पंजी करून जमीन तयार करावी.
* शून्य मशागत पद्धतीने सुद्धा काही शेतकरी चिया लागवड करतात. सिंचनादरम्यान पाणी वाटपात सुसूत्रता यावी आणि पाणी साचू नये यासाठी शेताचे सपाटीकरण आवश्यक आहे.
* जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी चांगले कुजलेले सेंद्रिय पदार्थ किंवा कंपोस्ट खत समाविष्ट करावे. योग्य निचरा होण्यासाठी गादीवाफा किंवा सरीवरंबा पद्धतीने लागवड करावी.
* पीकपेरणी पूर्वी शेतामध्ये बीडी कंपोस्ट एक डेपो खत किंवा गांडूळखत १ ते १.५ टन प्रति एकर जमिनीत मिसळावे किंवा पेरणी सोबत वापरल्यास पिकाला फायदा होतो.
बियाणे :
* यशस्वी लागवडीसाठी उच्च प्रतीचे चिया बियाणे निवडणे महत्वाचे आहे. स्वच्छ, आकाराने एकसारखे, शुद्ध व भरीव बियाणे निवडावी. त्याची सत्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी विश्वसनीय पुरवठादाराकडून खरेदी करावे.
* सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या शेतकऱ्यांनी फक्त सेंद्रिय प्रमाणित शेतकऱ्याकडूनच बियाणे विकत घ्यावे. शेतकरी घरचे बियाणे राखून ठेवून घरचे बियाणे वापरू शकतो त्याने उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो.
* सीएफटीआरआयने चियाम्पियन डब्ल्यू- ८३ (पांढऱ्या बिया) आणि चियाम्पियन बी-१ (काळ्या बिया ) या चिया पिकाच्या दोन उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत.
बियाणे प्रमाण : १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे.
बीज प्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्याला ट्रायकोडर्मा पावडर ४ ते ५ ग्रॅम प्रती किलो बीज प्रक्रिया करावी. कोरडी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
पेरणी तंत्र
पेरणी : पेरणीकरतांना २० ते २५ किलो बारीक चाळलेली माती घेऊन त्यामध्ये चिया बियाणे योग्य प्रमाणात मिसळून घ्यावे. चिया पिकाची लागवड वेगवेगळ्या अंतरावरती केली जाते.
जसे की ४५X१५, ४५X३०, ६०x१५, ६०X३० सेंटीमिटर. यापैकी रब्बी हंगामात ४५X३० अंतरावर लागवड केल्यास चिया पिकाची उत्पादकता व गुणवत्ता चांगली दिसून आली आहे.
खोली १.५ सेंटीमिटर असावी. बियाणे नाजूक व लहान असल्याने खोल पेरणी करू नये. काही शेतकरी फेकून सुद्धा चियाची लागवड करतात. मात्रे या पद्धतीने पेरणी करताना तण नियंत्रण आणि अंतर मशागतीला अडचणी येतात.
चिया लागवडीसाठी पुरेसा पाणीपुरवठा आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमिनीला सिंचन करावे जेणे करून जमीन ओलसर आणि बियाणे उगवण्यास तयार होईल.
रोपवटिका पध्दत :
१०० ग्रॅम बिया समान प्रमाणात बारीक वाळूमध्ये मिसळून गादी वाफ्यावर एकसारखे पसरवावे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बेडला ताबडतोब आणि नियमितपणे पाणी द्यावे. २१ दिवसाचे रोप झाल्यावर ६०x ३० सेंटीमीटर वर लागवड करावी. १०० ग्राम बियाण्यांची रोपे एक एकर लागवडीकरिता पुरेशी होतात.
पाणी : चियाला नियमित पाणी देणे आवश्यक असते. विशेषत: फुल आणि फळधारणाच्या काळात पाणी देणे गरजेचे आहे.
खत व्यवस्थापन : चियाला योग्य प्रमाणात खत देणे आवश्यक आहे. रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खतांचा वापर करणे अधिक चांगले आहे. कीड नियंत्रण : चियाला किडी आणि रोगांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. कीड नियंत्रणासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. तोडणी : चियाची तोडणी साधारणपणे ९० ते १२० दिवसांनी केली जाते. उत्पादन : चियाच्या उत्पादनावर हवामान, जमीन आणि लागवड तंत्रज्ञानाचा प्रभाव पडतो. योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
चिया लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
* योग्य बियाणे निवडा.* जमीन योग्य तयार करा.* पेरणी योग्य अंतरावर करा.* पाणी आणि खत योग्य प्रमाणात द्या.* कीड आणि रोगांपासून संरक्षण करा.* तोडणी योग्य वेळी करा.
चिया लागवड एक फायदेशीर आणि सोयीचे तंत्र आहे. योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच, चियाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे चिया लागवडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chia Crop: चिया पिकाची निवड का करावी? जाणून घ्या सविस्तर