Join us

ऊस लागवड करताय? ८६०३२ पेक्षा जास्त उत्पादन व साखर उतारा देणारी 'ही' जात निवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:13 IST

राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे. आडसाली उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारीत ऊस वाणांचा वापर केला तर उत्पादन वाढू शकते.

राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे. आडसाली उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारीत ऊस वाणांचा वापर केला तर उत्पादन वाढू शकते.

तसेच ५ फुट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.

फुले ऊस १५००६ ची वैशिष्ट्ये Sugaracane 15006◼️ को ८६०३२ पेक्षा ११.०३% अधिक ऊस उत्पादन (१४३.३२ टन/हे.)◼️ को ८६०३२ पेक्षा ११.८३% अधिक साखर उत्पादन (२०.४२ टन/हे.)◼️ को ८६०३२ पेक्षा २.२२% अधिक सुक्रोज % (२०.०७%)◼️ को ८६०३२ पेक्षा ०.९६% अधिक सीसीएस % (१४.२१%)◼️ को ८६०३२ पेक्षा १०.६२% अधिक खोडवा ऊस उत्पादन (१२४.१५ टन/हे.)◼️ को ८६०३२ पेक्षा १५.४३% अधिक खोडवा साखर उत्पादन (१७.५८ टन/हे.)◼️ ऊस जाड, कांड्या सरळ आणि कांड्यावर मेणाचा थर आहे.◼️ लाल कूज आणि मर रोगास मध्यम प्रतिकारक.◼️ चाबुक काणी रोगास प्रतिकारक.◼️ खोड किड, कांडी किड, शेंडे कीड आणि खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते.◼️ मिलीबग या किडीस काही प्रमाणात बळी पडते.◼️ तुरा उशिरा व अत्यल्प.◼️ पाने मध्यम रुंदीची, सरळ व टोकदार, पानाचे टोपनावर कूस नाही, पाचट सहज निघते.

अधिक वाचा : आडसाली उसाच्या उत्पादन वाढीसाठी ह्या आहेत महत्वाच्या पाच टिप्स.. वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसलागवड, मशागतशेतीशेतकरीपीककीड व रोग नियंत्रणठिबक सिंचनपीक व्यवस्थापन