pakshi thanbe पावसाळी हवामानामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी कीड-रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची ठरते. या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी शेतात पक्षी थांबे तयार केले तर मोठ्या प्रमाणात किडींचे प्रमाण कमी होते.
पक्षी कसे करतात संरक्षण?◼️ पूर्वी शेतीच्या परिसरात भरपूर प्रमाणात चिमण्या, कावळे, पोपट, कबुतर, मैना, साळुंकी असे कितीतरी पक्षी दिसायचे.◼️ हानिकारक किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यामध्ये हे पक्षी महत्वाचे ठरतात. सुमारे २० टक्के पक्षी मांसाहारी आहेत.◼️ गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी शेतांमधील अळ्या व किडी वेचून खातात.◼️ पक्ष्यांना जर किडी, अळ्या उपलब्ध झाल्या तर ते पिकांचे नुकसान करीत नाहीत.◼️ सुमारे २० टक्के नियंत्रण पक्ष्यांमार्फत होऊ शकते.
कसे लावाल सापळे?◼️ चार ते पाच फूट उंच काठी घेऊन 'इंग्रजी टी' अक्षराप्रमाणे पक्ष्यांना बसण्यासाठी थांबे तयार करावेत.◼️ शेताच्या मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते.◼️ त्यामुळे कीड रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांची भूमिका महत्वाची ठरते आहे.◼️ या पक्ष्यांना शेतात आकर्षित करण्यासाठी एका एकरात जवळजवळ दहा पक्षी थांबे उभारावेत.
पक्षी थांब्याचे फायदे◼️ या ठिकाणी बसलेले पक्षी पिकांवरील अळ्या खातात. पिकांवरील अळ्या खाल्ल्यामुळे पिकांचे संरक्षण होते.◼️ हे थांबे पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखे काम करतात. ज्यामुळे परिसंस्थेतील जैवसाखळी सुदृढ राहते.◼️ रासायनिक औषधांऐवजी पक्ष्यांकडून कीड नियंत्रण झाल्याने शेती खर्च कमी होतो.◼️ नैसर्गिक उपायांमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत नाही.◼️ किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळून उत्पादन वाढते.
अधिक वाचा: ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?