Join us

ठिबक व तुषार सिंचनासाठी 'या' दोन योजनेतून घेता येईल ९० टक्के अनुदान; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:13 IST

thibak anudan yojana प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनांतर्गत अनुदान दिले जाते.

प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के असे एकुण ८० टक्के व ७५ टक्के पुरक अनुदान देय आहे.

प्रति थेंब अधिक पीक योजनेतर्गत सुक्ष्म सिंचन घटकाकरीता निवड होऊन लाभ देण्यात आलेल्या अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना पुढील दोन्ही योजनामधुन अनुदान देण्यात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने अशाप्रकारे दोन्ही योजनामधुन पात्र शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीतील अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतुन अदा करण्यात येते.

उर्वरीत १०%/१५ % अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधुन अदा करण्यात येते.

प्रवर्ग व देय अनुदान१) अनुसुचीत जातीअ) अल्प व अत्यल्प भुधारक- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पिक - ५५%- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना/केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना - २५%- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना - १०% (जास्तीत जास्त  रु. ९७,००० ठिबकसाठी आणि रु. ४७,००० तुषार सिंचनसाठी)- एकूण - ९०%ब) इतर शेतकऱ्यांना- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पिक - ४५%- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना/केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना - ३०%- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना - १५% (जास्तीत जास्त  रु. ९७,००० ठिबकसाठी आणि रु. ४७,००० तुषार सिंचनसाठी)- एकूण - ९०%

२) अनुसुचीत जातीअ) अल्प व अत्यल्प भुधारक- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पिक - ५५%- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना/केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना - २५%- बिरसा मुंडा कृषी क्रांती  योजना - १०% (जास्तीत जास्त  रु. ९७,००० ठिबकसाठी आणि रु. ४७,००० तुषार सिंचनसाठी)- एकूण - ९०%ब) इतर शेतकऱ्यांना- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पिक - ४५%- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना/केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना - ३०%- बिरसा मुंडा कृषी क्रांती  योजना - १५% (जास्तीत जास्त  रु. ९७,००० ठिबकसाठी आणि रु. ४७,००० तुषार सिंचनसाठी)- एकूण - ९०%

अधिक माहितीसाठी संपर्कआपल्या जवळील सहाय्यक कृषी अधिकारी/मंडल कृषी अधिकरी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिक वाचा: महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय

टॅग्स :ठिबक सिंचनपीकशेतकरीशेतीकृषी योजनापाणी