lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा?

temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा?

Temperature Rise: Solapur recorded the highest temperature at 43.7 degrees, where was the mercury today? | temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा?

temperature Rise: सोलापूरात ४३.७ अंशांनी सर्वाधिक तापमानाची नोंद, कुठे कसा होता आज पारा?

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाली.

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे. आज (दि २९) रोजी सोलापूर शहरात सर्वाधिक तापमानाची हवमान विभगााने नोंद केली. यावेळी ४३.७ अंश तापमान नोंदवले गेले. हवमान विभागाने जाहीर केलेल्या विशेष हवमान बुलेटीनमध्ये नोंदवल्या गेलेल्या अहवालानुसार आज मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाली.

उत्तर कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला होता. यावेळी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांपर्यंत गेले होते. ठाण्यात ४०.८ अंश तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्यात तापमानाचा पारा चढाच असून परभणी ४२.८ अंश तर नांदेड ४२.४ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ४०.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून धाराशिव, लातूर जिल्ह्यात ४०.४ अंश तापमान नोंदवले गेले.

 

राज्यात पुढील पाच दिवस तापमानात होणार वाढ, काय दिला हवमान विभागाने अंदाज

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी तापमान टोक गाठत आह. वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात ४१.८ अंश तर यवतमाळ ४१.५ तर जळगावात ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यात आज ४१.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून सातारा सांगलीही चाळीसपार गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात ४१.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Temperature Rise: Solapur recorded the highest temperature at 43.7 degrees, where was the mercury today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.