Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत? 

शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत? 

Latest News Why are you paying Rs. 500 per day to keep herd of goats in farm? | शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत? 

शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत? 

Agriculture News : शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप (Shelya Mendhya Kalap) बसविले जात आहेत.

Agriculture News : शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप (Shelya Mendhya Kalap) बसविले जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

चंद्रपूर : अलीकडे शेतीत रासायनिक खतांचा (Fertilizer) वापर वाढल्याने अनेक शेतकरी शेणखताचा वापर करीत आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने शेतकरी शेळ्यांचा कळपाचा (Goat herd) देखील वापर करीत आहेत. शेळ्यांच्या कळपामुळे शेतात खताची उणीव भरून काढली जाते. 

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. या जमिनीत खरीप व रब्बी पिकांची लागवड केली जाते. शेतातील पीकवाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात असल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकरी शेणखताचा वापर करीत आहेत. यासाठी उन्हाळ्यात आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप (Shelya Mendhya Kalap) बसविले जात आहेत.

शेतातील कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. जनावरांची संख्या घटली आहे. त्यामुळे शेतात शेणखत टाकणे दुरापास्त झाले आहे. मात्र, परजिल्ह्यातील मेंढपाळ हंगामी स्वरूपात शेळ्या, मेंढ्यांना घेऊन सिंदेवाही तालुक्यात दिसून येत आहेत. शेतकरी आपल्या शेतात शेळ्या, मेंढ्यांचे कळप बसविण्यासाठी मनधरणी करीत आहेत. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना शेतकरी शेतातील पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहेत.

५०० रुपये प्रत्येक दिवसाचा दर
शेतात शेळ्या, मेंढ्याच्या संख्येवर मोबदला ठरत असतो. दर दिवशी ५०० रुपये मोबदला मोजावा लागतो. सेंद्रिय खत शेतजमिनीला व पीकवाढीसाठी पोषक असल्याने शेतकरी शेळ्या, मेंढ्यांचे कळप शेतात बसवीत आहेत. दिवसभर मेंढपाळ शेळ्यांना घेऊन चराईसाठी नेतात. रात्रीच्या वेळी कळप बसवतात. पूर्वीपेक्षा आता शेळ्याची संख्या घटली आहे.

Pre monsoon Vaccination : जनावरांची वाढ खुंटली, पोटात जंत झाले; जनावरांना कुठले औषध द्याल?

Web Title: Latest News Why are you paying Rs. 500 per day to keep herd of goats in farm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.