Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या (Magel Tyala solar Pump Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंपाचा लाभ मिळत आहे. या योजनेची सद्यस्थिती अशी आहे की, अनेक शेतकरी जे आहेत, ते सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत, अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप इन्स्टॉल (solar Pump Install) करण्याचे कामही सुरू आहे. यात अनेक शेतकऱ्यांना सध्या मोबाईल नंबर अपडेट (Mobile Number Update) करण्याचे मॅसेज येत आहेत. या लेखातून याबाबतची माहिती घेऊया..
मागेल त्याला सोलर पंप योजनेचे Solar Pump Yojana) माध्यमातून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला अर्ज प्रक्रिया वेंडर सिलेक्शन शुल्क भरणे आदी प्रक्रिया पार पडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना साहित्य देखील मिळाले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप इन्स्टॉल देखील झाले आहेत.
मात्र अशातच काही शेतकऱ्यांना मोबाईल नंबर अपडेट करण्याचे मॅसेजेस येत आहेत. 'Application with Duplicate mobile number found please Register your new mobile number for future processing application' अशा पद्धतीचा मॅसेज येत आहे. या मेसेज चा अर्थ असा आहे की तुमच्या अर्जासोबत चुकीचा नंबर जोडला गेला आहे कृपया तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर पुढील प्रक्रिया करता जोडावा.
दरम्यान शेतकऱ्यांचे हे मोबाईल नंबर मेडा कुसुमसह महावितरणच्या योजनांसाठी वापरला गेला असल्याने पुन्हा नव्याने नवीन नंबर जोडण्यासाठी मॅसेज करण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांना हा मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य राहणार असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
असा करा मोबाईल नंबर अपडेट
- तर सर्वप्रथम मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या अधिकृत https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php संकेतस्थळावर जायचं आहे.
- या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला एमकेएमटीआयडी प्रविष्ट करायचा आहे.
- यानंतर पुढील विंडोमध्ये चेंज मोबाईल नंबर असा पर्याय दिसून येईल.
- या रकान्यात तुमचा जुना नंबर प्रविष्ट करायचा आहे.
- खालील रकान्यात नवीन नंबर प्रविष्ट करायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला त्या मोबाईलवर एक ओटीपी जाईल.
- ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यानंतर आपल्याला महावितरण करून मोबाईल नंबर बदलल्याचा मॅसेज येईल.