Shetmal Bajar : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यातील व्यापार व्यवहारांमध्ये दोन दिवसांची खंड पडला होता. व्यापाऱ्यांच्या थप्प्या आणि नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारचे व्यवहार पूर्णपणे बंद होते. (Shetmal Bajar)
मात्र, ३ डिसेंबरपासून मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्री पुन्हा पूर्ववत झाली असून, सुरुवातीच्या दिवशीच सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली.(Shetmal Bajar)
सोयाबीनची आवक वाढ
जवळपास दीड महिन्यापासून सोयाबीन शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. परंतु समाधानकारक भावाच्या प्रतीक्षेत अनेकांनी विक्री रोखून धरली होती. आर्थिक गरज असणाऱ्यांनीच मागील आठवड्यांत विक्री केली होती. मात्र, आता बाजारात भाववाढीची आशा मंदावल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणू लागले.
बुधवारी सकाळ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे १,००० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली.
सोयाबीनचे दर किमान : ४,०५० रु. व कमाल : ४,४५० रु.
यंदा अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते, उत्पादनात तीव्र घट झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अपेक्षा किमान ५,००० रु. दराची होती; पण बाजारभाव अपेक्षेप्रमाणे न गेल्याने निराशा व्यक्त होत आहे.
भाव वाढण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आता मिळेल त्या दरात विक्रीसाठी पुढे येत आहेत.
हरभऱ्याची मध्यम आवक
सरासरी दर ४,५१७ रु.
बुधवारी मोंढ्यात २०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला.
दर पुढीलप्रमाणे किमान : ४,०५० रु.
कमाल : ४,९८५ रु.
सरासरी : ४,५१७ रु.
हरभरा बाजारात स्थिरतेचे संकेत देत आहे.
हळद मंदावली
केवळ ५०० क्विंटलची आवक
सोयाबीनच्या तुलनेत हळदीची आवक तितकीच कमी नोंदली गेली. बुधवारी ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली.
सरासरी भाव १३,९०० रुपये प्रति क्विंटल आवक कमी असल्याने हळद बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे.
मोंढ्यातील शेतमालाची बुधवारीची आवक व भाव
| शेतमाल | आवक (क्विंटल) | सरासरी भाव (₹) |
|---|---|---|
| गहू | २० | २,८१० |
| ज्वारी | १,९०७ | — |
| सोयाबीन | १,०२० | ४,२५० |
| हरभरा | २०० | ४,५१७ |
| हळद | ५०० | १३,९०० |
आवक वाढीमुळे बाजारात हालचाल
सोयाबीनचे उत्पादन नुकसान झाल्यानंतरही दरात अपेक्षित सुधारणा दिसत नाही. महिनाभर प्रतीक्षा करूनही भाव वाढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढली असून सध्या शेतकरी हंगामी बाजारावर अवलंबून राहण्याची गरज व्यक्त करीत आहेत.
