Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

Jayakwadi Dam: How much water is left in Jayakwadi at the beginning of May? find out | Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

Jayakwadi Dam: मेच्या सुरुवातीला जायकवाडीत किती पाणी उरलंय? जाणून घ्या

पाणीसाठा खालावतोय. पाणी जपून वापरावे लागणार; जलसंपदा विभागाने जाहीर केली धरणसाठ्याची आकडेवारी...

पाणीसाठा खालावतोय. पाणी जपून वापरावे लागणार; जलसंपदा विभागाने जाहीर केली धरणसाठ्याची आकडेवारी...

राज्यात तापमानाचा पारा वाढत असून बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. मेच्या सुरुवातीला मराठवाड्यातील सर्वात अधिक क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ ८.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी तो ५२.३६ टक्के होता.

मराठवाड्यात नागरिकांना वाढत्या तापमानासह पाणीटंचाईचे चटकेही सहन करावे लागत आहेत. वेगवेगळ्या भागात टँकर जायकवाडी धरणात आज  १८८.६० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आता १३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी तो ४८.८७ टक्के एवढा साठा शिल्लक होता.

पैठण येथील जायकवाडी धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाचीपाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या 'मेरी' या संस्थेने २०१२ मध्ये दिला असताना या अहवालावर १२ वर्षांमध्ये काहीही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

मराठवाड्यातील लघू, मध्यम, मोठ्या धरणांमध्ये २७ एप्रिल रोजी १०२८ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला हाेता. ३६. २९ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. जो मागील वर्षी २७७० दलघमी म्हणजे ९७.८१ टीएमसी होता. जायकवाडी धरणात ९.९८ टक्के पाणीसाठा राहिला होता. मराठवाड्यातील ९२० एकूण धरणांमध्ये १४.१७ टक्के जलसाठा उरला होता.

Web Title: Jayakwadi Dam: How much water is left in Jayakwadi at the beginning of May? find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.