Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > समन्वित फुलशेती संशोधन प्रकल्पाची सोलनमध्ये ३३ वी वार्षिक बैठक यशस्वी

समन्वित फुलशेती संशोधन प्रकल्पाची सोलनमध्ये ३३ वी वार्षिक बैठक यशस्वी

33rd Annual Meeting of Integrated Floriculture Research Project held successfully in Solan | समन्वित फुलशेती संशोधन प्रकल्पाची सोलनमध्ये ३३ वी वार्षिक बैठक यशस्वी

समन्वित फुलशेती संशोधन प्रकल्पाची सोलनमध्ये ३३ वी वार्षिक बैठक यशस्वी

पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले  (AICRP on Floriculture ) ची ३३ वी वार्षिक बैठक डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाच्या नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश येथे २७-२९ मे २०२५ रोजी संपन्न झाली.

पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले  (AICRP on Floriculture ) ची ३३ वी वार्षिक बैठक डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाच्या नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश येथे २७-२९ मे २०२५ रोजी संपन्न झाली.

पुणे (ता.२९) : पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले  (AICRP on Floriculture ) ची ३३ वी वार्षिक बैठक डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाच्या नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश येथे २७-२९ मे २०२५ रोजी संपन्न झाली.  

या बैठकीचा मुख्य उद्देश गेल्या वर्षी (२०२३-२४) भारत भर पसरलेल्या समन्वित केंद्रांवर (२२) केलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेणे आणि २०२१-२०२२ ते २०२३-२४ पर्यंत सुरू झालेल्या तीन वर्षांच्या तांत्रिक कार्यक्रमाच्या एकत्रित आढावा घेणे हा होता.

यावेळी प्रा. (कर्नल) राजेश्वर सिंग चंदेल, माननीय कुलगुरू डॉ. वाय.एस. पी.यू.एच.एफ. सोलन प्रमुख पाहुणे होते. तर सहाय्यक महासंचालक (फुले, भाज्या, मसाले आणि औषधी आणि सुगंधी वनस्पती) आयसीएआर, नवी दिल्ली डॉ. सुधाकर पांडे आणि डॉ. संजीव के. चौहान, डॉ. वाय.एस. पी.यू.एच.एफ. सोलन हे कार्यक्रमात सन्माननीय अतिथी होते.

डॉ. के.व्ही. प्रसाद, संचालक, पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांनी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले  ३३ व्या वार्षिक गट बैठकीच्या सर्व मान्यवरांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत केले आणि प्रकल्प समन्वयक अहवाल (२०२३-२४ दरम्यान समन्वित प्रकल्पाच्या प्रमुख संशोधन कामगिरीचे संकलन) सादर केले. तीन दिवस चालेल्या बैठकीमध्ये विविध समन्वित केंद्रांचे अनुसंधान कार्याचे सादरीकरण झाले.

हेही वाचा : शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर

Web Title: 33rd Annual Meeting of Integrated Floriculture Research Project held successfully in Solan