पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी युरियावरील अनुदान म्हणून १० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर प्रति पिशवी ३,००० रुपये किमतीचा युरिया, शेतकऱ्यांना प्रति पिशवी ३०० रुपये, इतक्या स्वस्त दराने दिला जातो. सरकारने युरिया अनुदान म्हणून १० लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला माहिती दिली की, युरिया जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना ३,००० रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. “ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत ३,००० रूपयांनी विकतात, तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकर्यांना ३०० रूपये दराने विकते. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर १० लाख कोटी रूपयांचे अनुदान देत आहे.
 
