सागर कुटे
बुलढाणा जिल्ह्यात गहू (Wheat) पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सद्यः स्थितीत गहू काढणीला आला असून, यंदा पिकाचा एकरी खर्च लक्षणीय वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
खर्च व परिश्रमाच्या तुलनेत यंदा भाव चांगले मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी गहू (Wheat) पिकाचे उत्पादन हे महत्त्वपूर्ण आहे.
या वर्षी सिंचनासाठी मुबलक पाणी असल्यामुळे तसेच, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गव्हाला बाजारात चांगला भाव मिळाल्याने गव्हाच्या(Wheat) क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
परंतु यावर्षी खर्च नेहमीपेक्षा जास्त यामध्ये बियाणे, तणनाशक, किटकनाशक, खते, मजुरी आणि वाहतूक खर्चाचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
उत्पादन वाढणार
* गहू (Wheat) पिकाला अनेक भागांत बदलते वातावरण, वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. तरीही, यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे.
* नवीन मालाची आवक सुरू झाल्यानंतर सर्वच प्रकारच्या धान्याचे भाव घसरतात, असा आजपर्यंतचा अंदाज आहे.
* खामगाव बाजार समितीत नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे; मात्र पुढील काळात आवक वाढल्यानंतर दरांवर परिणाम दिसून येऊ शकतात.
काय अपेक्षा?
* गहू पिकाचा दर हे जागतिक बाजारातील आणि देशातील पिकांच्या उत्पादनावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार व कृषी मंडळाने शेतकऱ्यांना त्वरित दरवाढीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
* शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी महत्त्वाची पावले उचलावीत, शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या आर्थिक गोंधळाला योग्य प्रतिसाद देणारी धोरणे लागू करणे आवश्यक आहे.
दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दर चांगले
मागील दोन वर्षांआधी २०२३ मध्ये गव्हाला २ हजार ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होते. त्या तुलनेत यंदा गव्हाला बाजार समितीत ३००० रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे, तर सरासरी २ हजार ७७५ रुपये दर आहेत; परंतु खर्च वाढल्याने दरवाढही अपेक्षित आहे.
गहू पिकाला एकरी खर्च
बियाणे | २००० |
रोटावेटर | १५०० |
पेरणी | १००० |
तणनाशक | ५०० |
किटकनाशक | १००० |
खत दोन वेळा | ४००० |
मजुरी | ६०० |
काढणी (हार्वेस्टर) | २००० |
वाहतूक | १२०० |
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi: शेतकऱ्यांनो! कापूस नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर