Lokmat Agro >बाजारहाट > यंदा हमीभावाने कापूस विकायचा? तर 'या' ॲपवर आताच नोंदणी करा; नोंदणी नसल्यास सीसीआय घेणार नाही कापूस

यंदा हमीभावाने कापूस विकायचा? तर 'या' ॲपवर आताच नोंदणी करा; नोंदणी नसल्यास सीसीआय घेणार नाही कापूस

Want to sell cotton at guaranteed price this year? Then register on 'Ya' app now; CCI will not buy cotton if you are not registered | यंदा हमीभावाने कापूस विकायचा? तर 'या' ॲपवर आताच नोंदणी करा; नोंदणी नसल्यास सीसीआय घेणार नाही कापूस

यंदा हमीभावाने कापूस विकायचा? तर 'या' ॲपवर आताच नोंदणी करा; नोंदणी नसल्यास सीसीआय घेणार नाही कापूस

Kapus Hamibhav Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे.

Kapus Hamibhav Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी 'कपास किसान' नावाचे मोबाईल ॲप ३० ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध केलेले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'कपास किसान' हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दि. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी.

३० सप्टेंबर ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत असल्याचे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने कळविले आहे. कापूस पिकाची नोंद करण्यासाठी सातबारा उतारा, सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नोंद, आधारकार्ड, शेतकऱ्याचे फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केले आहे.

हेही वाचा : वहिवाट, शेतरस्ता होणार मोकळा होणार; शेतकऱ्यांना मोफत पोलिस बंदोबस्त देण्याबाबत गृह विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Want to sell cotton at guaranteed price this year? Then register on 'Ya' app now; CCI will not buy cotton if you are not registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.