Join us

Vegetable Market Rate : टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांच्या दरात मंदी; उत्पादक शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:48 IST

Vegetable Market Rate Update : मागील आठवडाभरापासून नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांचे दर चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे फळ भाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

मागील आठवडाभरापासून नांदेड बाजारपेठेत टोमॅटोसह कोबी, वांगे, मिरची आदी फळ भाज्यांचे दर चांगलेच कोसळले आहे. त्यामुळे फळ भाजी उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये सर्वाधिक फटका हा फळ भाज्या उत्पादक शेतकऱ्यांना बसला. हाती आलेला माल अतिवृष्टीने हिरावला गेल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले. त्यातून सावरण्यासाठी रब्बी हंगामात पुन्हा शेतकऱ्यांनी फळभाज्यांची लागवड केली. त्यातून चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र अचानक बाजारपेठेत टोमॅटो, कोबी, वांग्याची आवक वाढल्याने या फळभाज्यांचे दर कोसळले. यामध्ये सर्वाधिक फटका हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहेत. दरम्यान, यावर्षी टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्चही निघला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी ज्ञानेश्वर जैलेवाड यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील बाजारात झालेली टोमॅटो आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/01/2025
राहता---क्विंटल100500750625
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3680012001000
वाईलोकलक्विंटल12100025001750
भुसावळवैशालीक्विंटल90100015001100
25/01/2025
कोल्हापूर---क्विंटल3485001200800
पुणे-मांजरी---क्विंटल63790018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल69400500450
संगमनेर---क्विंटल330350800575
श्रीरामपूर---क्विंटल36500700600
राहता---क्विंटल255001000800
रामटेकहायब्रीडक्विंटल708001000900
अकलुजलोकलक्विंटल308001000900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1458001000900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3480012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल6693001000650
नागपूरलोकलक्विंटल500400500475
वाईलोकलक्विंटल120100018001400
मंगळवेढालोकलक्विंटल4730011001000
कामठीलोकलक्विंटल40500900700
पनवेलनं. १क्विंटल580200025002250
सोलापूरवैशालीक्विंटल258200700400
जळगाववैशालीक्विंटल115400600500
नागपूरवैशालीक्विंटल4005001000825
कराडवैशालीक्विंटल51100012001200
भुसावळवैशालीक्विंटल22100015001200

सौजन्य : कृषी पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य.

हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात

टॅग्स :मार्केट यार्डशेतकरीटोमॅटोभाज्याबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती