Urad Bajar Bhav : एप्रिल महिन्यापासून उडीद आणि उडीद डाळीची बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक(Urad Arrival) किती झाली आणि कसा बाजारभाव मिळतोय आहे ते वाचा सविस्तर.(Urad Bajar Bhav)
राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ मे) रोजी उडीदाची आवक १३ क्विंटल झाली तर त्याला सरासरी दर हा ७ हजार ३९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर खुल्या बाजारात डाळीला सर्वसाधारणपणे १०० ते १३० रुपये प्रति किलो याप्रमाणे दर मिळतो आहे.
बाजार समितीमध्ये काळा, मोगलाई (Mughali) जातीच्या उडदाची आवक झाली. पुणे, धुळे,चिखली, कल्याण या बाजार समितीमध्ये उडीदाची आवक पाहायला मिळाली.
पुणे बाजार समितीमध्ये ३ क्विंटल उडदाची आवक(Urad Arrival) झाली त्याला सर्वसाधारण दर हा ९ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा १० हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आज पुणे बाजार समितीत उडदाला सर्वाधिक दर मिळाला.
धुळे बाजार समितीमध्ये ३ क्विंटल उडदाची आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान व कमाल दर हा ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आज धुळे बाजारात उडदाला सर्वात कमी दर मिळाला.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये उडीदाची आवक(Urad Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.
शेतमाल : उडीद
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/05/2025 | ||||||
पुणे | --- | क्विंटल | 3 | 9200 | 10300 | 9750 |
धुळे | काळा | क्विंटल | 3 | 4800 | 4800 | 4800 |
चिखली | काळा | क्विंटल | 4 | 6000 | 6625 | 6310 |
कल्याण | मोगलाई | क्विंटल | 3 | 8500 | 9000 | 8700 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)