पारंपरिक पिकांसोबत शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे झुकताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या हळदीच्या बेण्यांची (Turmeric Seed) मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, दरातही वाढ होत आहे.
प्रत्येक वर्षी साधारणतः मे महिन्यात हळद लागवड केली जाते, त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच शेतकरी हळद बेण्याच्या (Turmeric Seed) शोधात असतात.
फेब्रुवारी महिन्यात हळदीचे दर नियंत्रणात होते आणि त्यावेळी अडीच हजार रुपये क्विंटल दराने बेणे मिळत होते. त्यानंतर हळदीचे भाव वाढत असल्याने साहजिकच बेण्याचे भावही वाढत आहेत. (Turmeric Seed)
सध्या हळदीच्या वाढत्या मागणीमुळे व दरवाढीमुळे शेतकऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. हळदीच्या बेण्याचे दर प्रतिक्विंटल तीन ते पाच रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. (Turmeric Seed)
हळद बेणे बाजारपेठांमध्ये मिळत नसून, ते शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असते. त्यामुळे चांगल्या प्रतीचे बेणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. (Turmeric Seed)
चांगल्या बेण्याला पसंती!
* हळदीच्या चांगल्या प्रतीच्या बेण्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या बेण्याचे भावही जास्त आहेत.
'हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. हळदीचे बेणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सध्या प्रतिक्विंटल ३ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत हळद बेण्याचे दर आहेत.' - सुभाष पाटील रंजवे, भोकरखेडा, ता. रिसोड