Join us
Daily Top 2Weekly Top 5

वायदे बाजारापेक्षा हळदीला २ हजारांनी कमी भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरावरून मोठे रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहेत. वायदे बाजाराच्या तुलनेत स्थानिक मोंढ्यात हळदीचे भाव तब्बल १५०० ते २००० रुपयांनी कमी पुकारले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरावरून मोठे रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहेत. वायदे बाजाराच्या तुलनेत स्थानिक मोंढ्यात हळदीचे भाव तब्बल १५०० ते २००० रुपयांनी कमी पुकारले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत बाजार समिती प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे की, दराचा हा प्रश्न तत्काळ न सुटल्यास बाजार समितीला टाळे ठोकले जाईल.

सध्या हळदीच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे, शेतकऱ्यांचा आरोप आहे की, जेव्हा वायदे बाजारात भाव तेजीत असतात, तेव्हा स्थानिक व्यापारी संगनमताने बोली कमी लावून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत.

या निवेदनावर जुनेद पठाण, पांडुरंग शातलवार, तानाजी भोसले, रामप्रसाद मगर, किशनराव कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता बाजार समिती प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि व्यापाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका

शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे - जोपर्यंत दराचा ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत हळदीचे लिलाव स्थगित करावेत. बाजार समिती प्रशासन, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची तातडीने बैठक बोलावून दराबाबत स्पष्टता आणावी. बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास बाजार समितीला टाळे ठोकून बंद पुकारण्यात येईल.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric prices lower than futures market; farmers threaten protest.

Web Summary : Farmers in Vasmat are protesting low turmeric prices compared to futures. The Swabhimani Shetkari Sanghatana threatens to lock the market if prices aren't rectified. Farmers allege trader collusion, demanding immediate resolution via meeting and halting auctions until fair prices are ensured.
टॅग्स :हिंगोलीशेती क्षेत्रस्वाभिमानी शेतकरी संघटनाशेतकरीबाजार