lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर

सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर

Turmeric arrival increased in Mondha of Sengaon; This is the average price | सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर

सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर

१५०० ते २००० क्विंटल आवक

१५०० ते २००० क्विंटल आवक

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व संत नामदेव बाजार समितीमध्ये मागील तीन दिवसांपासून हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे हळदीची आवक वाढल्याचे दिसून येत आहे.

मागच्या तीन दिवसांपासून हळदीला सरासरी १८ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे येथील मोंढ्यात हळदीची आवक वाढली आहे. बुधवारी दोन्ही मोंढ्यात जवळपास १५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती व संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आठवड्यात हळदीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सद्यः स्थितीत हळदीस सरासरी समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची विक्री करणे पसंत केले आहे. मंगळवार व बुधवार या दोन्ही मोंढ्यात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात झाली.

बुधवारी जवळपास १५०० ते २००० क्विंटल आवक झाली होती. यावेळी झालेल्या बोलीमध्ये हळदीच्या कांडीस १५ ते १८ हजार रुपये भाव मिळाला. तर हळदीच्या ग‌ट्टूला १४ ते १६ हजार सरासरी भाव मिळाला. भाव जर कायम स्थिर राहिले तर शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून सुरू आहे. 

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

Web Title: Turmeric arrival increased in Mondha of Sengaon; This is the average price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.