Join us

Tur Bajar Bhav : विदर्भाच्या 'कारंजा, अमरावती'तून आज सर्वाधिक तूर आवक; वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:32 IST

Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज बुधवार (दि.०३) रोजी एकूण ६७७२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २१७ क्विंटल गज्जर, ४५८४ क्विंटल लाल, २९ क्विंटल लोकल, ४३ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज बुधवार (दि.०३) रोजी एकूण ६७७२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २१७ क्विंटल गज्जर, ४५८४ क्विंटल लाल, २९ क्विंटल लोकल, ४३ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. विदर्भातील कारंजा, अमरावती, अकोला, मूर्तीजापूर या बाजार समितीत आज तुरीची सर्वाधिक आवक बघावयास मिळाली.  

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या अमरावतीबाजारात कमीत कमी ६१०० तर सरासरी ६२५० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ५२००, अकोला येथे ६४५०, मालेगाव येथे ५४८०, चिखली येथे ५६००, नागपूर येथे ६२५५, मूर्तीजापूर येथे ५९९५, लोणार येथे ६१००, मेहकर येथे ५८००, उमरगा येथे ५७००, सिंदी (सेलू) येथे ६१५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

बाजारात लाल तूर वगळता इतर वाणांच्या तुरीची आवक आज नगण्य होती. ज्यात सर्वाधिक आवकेला कारंजा येथे कमीत कमी ५६५५ तर सरासरी ६१३५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

तसेच गज्जर वाणाच्या तुरीला आज मुरूम येथे कमीत कमी ६००० तर सरासरी ६३१२, लोकल वाणाच्या तुरीला काटोल येथे कमीत कमी ५२०० तर सरासरी ५७००, पांढऱ्या तुरीला माजलगाव बाजारात कमीत कमी ६१०० तर सरासरी ६३००, देऊलगाव राजा येथे ५९०२, गंगापूर येथे ५६०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/09/2025
पैठण---क्विंटल4631963196319
कारंजा---क्विंटल1500565563356135
मानोरा---क्विंटल395550061716000
मुरुमगज्जरक्विंटल217600064316312
अकोलालालक्विंटल947600066556450
अमरावतीलालक्विंटल2110610064006250
धुळेलालक्विंटल42400057505200
मालेगावलालक्विंटल25370055115480
चिखलीलालक्विंटल30510061505600
नागपूरलालक्विंटल480600063406255
मुर्तीजापूरलालक्विंटल700570062905995
लोणारलालक्विंटल26600062006100
मेहकरलालक्विंटल70520060355800
उमरगालालक्विंटल4570057005700
सिंदी(सेलू)लालक्विंटल150595062006150
काटोललोकलक्विंटल29520060005700
माजलगावपांढराक्विंटल41610064006300
देउळगाव राजापांढराक्विंटल1590259025902
गंगापूरपांढराक्विंटल1560056005600

टिप : वरील सर्व आकडेवारी केवळ सायंकाळी ०५.०० वा. पर्यंतची आहे. 

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र 

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डशेतकरीकारंजाअमरावतीविदर्भशेती क्षेत्र