Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav: latest news Read more about Tur Bajar Bhav Guarantee in 'This' Bazaar Committee | Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीएवढा (MSP) बाजार समितीत दर मिळत आहे. वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीएवढा (MSP) बाजार समितीत दर मिळत आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीएवढा (MSP) बाजार समितीत दर मिळत असल्याने, जवळपास पंधरा दिवसांत एक रुपयाची तूर खरेदी झाली नाही. खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे पाहावयास मिळत आहे. (Tur Bajar Bhav)

लातूर जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. त्या पाठोपाठ तुरीचा ७१ हजार ४७५ हेक्टवर पेरा झाला होता. पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे पीकही बहरले होते. दीड महिन्यापासून तुरीची काढणी आणि राशींना सुरुवात झाली.

दरम्यान, शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत (MSP) नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले. जवळपास महिनाभरात केवळ ५२६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन (Online) नोंदणी केली आहे. 

हमीभाव केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकरी अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीचे उत्पादन घेतले जाते. चांगले पर्जन्यमान झाल्याने उत्पन्नही चांगले होत आहे. मात्र दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. १३ केंद्रे नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आली आहेत. परंतु एक रुपयाचीही अद्याप खरेदी झाली नाही. (Tur Bajar Bhav)

कमाल दर किती?

* गेल्या आठवडाभरात तुरीस बाजार समितीत कमाल दर ७ हजार ६०१ रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. किमान दर ७ हजार रुपयांपर्यंत आहे. दररोज सरासरी साडेतीन हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. 

* पाच महिन्यांपूर्वी तुरीच्या दरात वाढ झाली होती. जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक भाव पोहोचला होता.

* गेल्या दोन महिन्यांपासून दरात घसरण झाली आहे. बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाल्याने ही घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आता दर स्थिर राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हमी केंद्रावर तूर खरेदी नाही..!

* हमी केंद्रावर  ५२६ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे.

*  शासनाने तुरीस ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीस २४ जानेवारीपासून प्रारंभ झाला.

* अद्यापही नोंदणी सुरू आहे, परंतु महिनाभराच्या कालावधीत केवळ ५२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

* हमीभावाने तूर खरेदीसाठी २४ जानेवारीपासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी ३० दिवस वाढविण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

तूर खरेदीसाठी १९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, हमीभावाप्रमाणे बाजार समितीत तुरीस दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी तूर विक्रीसाठी केंद्रांकडे येत नाही. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

बाजार समितीत भाव काय?

तारीख                    आवक साधारण दर
२५ फेब्रु.             ३,५३८       ७,४००
२४ फेब्रु.                ५,४९५    ७,५००
२२ फेब्रु.                   २,४८८  ७,५००
२१ फेब्रु.                        २,४२१७,६५०
२० फेब्रु.                    ३,४७८    ७,६००

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : हरभऱ्याला हमीभावाचे सरंक्षण केव्हा? वाचा सविस्तर

Web Title: Tur Bajar Bhav: latest news Read more about Tur Bajar Bhav Guarantee in 'This' Bazaar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.