Tomato Market : टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहातील पुणे मागील (Pune Tomato Market) सरासरी किंमती ११४१ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीमध्ये २८ टक्क्यांनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १.२ टक्क्यांनी घट झाली आहे.
प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती १८०० रुपये प्रति क्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती १०३३ रुपये प्रति क्विंटल होत्या. गेल्या महिन्यात ५५० रुपये ते ६०० रुपये प्रति क्रेट विकला जाणाऱ्या टोमॅटोचे भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात टोमॅटोचे बाजारभावदेखील गडगडले आहेत. यावर्षी मे महिन्यात जास्तीत जास्त भाव ४५० ते ६०० रुपये असणारा भाव सध्या ७० ते २५० रुपये भाव सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गेल्या महिन्यात टोमॅटो पिकास असलेला भाव अचानकपणे गडगडल्याने ऐन मोक्याच्या वेळी पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यापासून सतत होत असलेल्या पावसामुळे मका पिकावर लष्करी अळीने चाल केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
- धनंजय बोरसे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, विठेवाडी
हेही वाचा : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी