कधी संततधार पडणारा पाऊस, कधी ढगाळ हवामान तर कधी कडाक्याचे ऊन या संमिश्र हवामानाचा परिणाम टोमॅटो पिकावर होत आहे.
त्यामुळे पिकावरील कीडरोगाचा प्रादुर्भावही वाढला असल्याने बाजारातील आवक मंदावली आहे. टोमॅटोसाठी असलेली मागणी व होणारी आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेले काही दिवस ६० ते १०० रुपये याप्रमाणे दरात चढ-उतार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे टोमॅटोवर काळे डाग पडले असून, टोमॅटो कापल्यावर आतही काळे डाग असल्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे टोमॅटोसाठी मागणी अधिक आहे. परंतु, पुरवठाच कमी होत असल्याने दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात १०० रुपये किलोचा दरगेल्या महिन्यात टोमॅटोचा दर १०० रुपयांवर पोहोचला होता. सध्या ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे दरातही चढ-उतार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
टोमॅटोचा भाव ८० रुपयांवरसध्या बाजारात ८० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. कच्चा, पिकलेला, डाग असलेला टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना खास निवडून घ्यावा लागत आहे.
नाशवंत पीक; भाव असो नसो, काढावाच लागतोटोमॅटो हे पीक नाशवंत असल्यामुळे बाजारात दर असो वा नसो शेतकऱ्यांना टोमॅटो काढून त्याची विक्री करावीच लागते. पीक लागवडीपासून बाजारात विक्रीला पाठविण्यापर्यंतचा येणारा खर्चही काही वेळा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटत आहे.
आवक वाढली पण पावसाचाही फटकापावसामुळे टोमॅटो लवकर खराब होतो. त्यामुळे आवक वाढली तरी मिळेल त्या दराला टोमॅटोची विक्री करावी लागते. दर कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो. परंतु, वाढले तर भुर्दंड बसतो.
शेतकऱ्यांसाठी टोमॅटो ठरतोय जुगारहवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम टोमॅटो पिकावर होत असल्यामुळे जिल्ह्यात टोमॅटो लागवड करणाऱ्यांची संख्या अल्प असून, शक्यतो रब्बी हंगामात लागवड करतात.
मागणी-पुरवठ्याचे गणित, दलालांचा जास्त फायदामागणी व पुरवठ्याच्या गणितात दर वाढले तर याचा थेट फायदा व्यापारी/दलालांना होतो. शेतकरी व ग्राहकांची मात्र फरफट होत असून, मिळेल तो भाव घ्यावा लागतो.
अधिक वाचा: 'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर