Til Bajar Bhav : मकर संक्रांतीला अवघा १ महिना शिल्लक असताना आता बाजारात तीळाची आवक होताना दिसत आहे. सध्या बाजारात तीळाला चांगला भाव मिळत आहे.
राज्यातील बाजार समितीमध्ये आज (५ डिसेंबर) रोजी तीळाची आवक २१७ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १३ हजार ३५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये पांढरा, लोकल या जातीच्या तीळाची आवक झाली. यात मुंबई येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या तीळाची सर्वाधिक २०३ क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १५ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा १९ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा १७ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तीळाची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : तील
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/12/2024 | ||||||
कारंजा | --- | क्विंटल | 5 | 10705 | 10705 | 10705 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 203 | 15000 | 19000 | 17000 |
अमरावती | पांढरा | क्विंटल | 3 | 8000 | 8500 | 8250 |
कल्याण | पांढरा | क्विंटल | 3 | 16000 | 17000 | 16500 |
अहमहपूर | पांढरा | क्विंटल | 3 | 14300 | 14300 | 14300 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)