Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:33 IST

Jowar Market राज्यात गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात ज्वारीची आवक कमी असून भाव वाढू लागले आहेत.

राज्यात गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारातज्वारीची आवक कमी असून भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर बाजारात मालदांडी ज्वारीला तब्बल ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक बळीराजा सुखावला असला तरी गोरगरीब कष्टकऱ्यांची भाकरी मात्र आता महाग झाली आहे.

ज्वारीची भाकरी ही सर्वसामान्य नागरिकांच्या आहारामधील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ज्वारीचे दर वाढू लागल्यामुळे सामान्य नागरिकांना भाकरी महाग झाली आहे.

गतवर्षी राज्यात सर्वत्र उत्पादन कमी झाले आहे. यामुळे यावर्षी जानेवारीमध्येच तुटवडा निर्माण झाला आहे. आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांना याचा तोटा सहन करावा लागत आहे.

ज्वारीचा उपलब्ध असलेला साठा कमी होत चालला आहे. यावर्षीही उत्पादन कमीच होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील वर्षभर ज्वारी भाव खाण्याची शक्यता आहे.

साधारणपणे गोकुळाष्टमीपासून ज्वारीच्या पेरण्या सुरू होतात. ज्वारी पेरणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत कालावधी असतो.

मात्र, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होणार असून यामुळे ज्वारीचे दर यंदा गगणाला भिडणार आहेत.

यंदा राज्यासह आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून ज्वारीचे उत्पादन कमी होणार आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडत आहे.

लागवड क्षेत्रात मोठी घटराज्यात आर्थिक पाहणी अहवाल आकडेवारीनुसार◼️ वर्ष २०००-०१ मध्ये एकूण लागवड क्षेत्रापैकी ५,०७४ हजार हेक्टरवर (३८.०६ टक्के) ज्वारीची लागवड होती.◼️ वर्ष २०११-१२ मध्ये हे क्षेत्र ४,०६० हजार हेक्टरवर (३१.१७ टक्के) आले.◼️ २०२१-२२ मध्ये ते २,३२० हजार हेक्टरवर (१९.८७ टक्के) घसरले.

उत्पादनातही उतरता आलेख◼️ वर्ष २०००-०१ मध्ये ३,९८८ हजार टन उत्पादन झाले होते.◼️ वर्ष २०११-१२ मध्ये ३,४५२ हजार टन मिळाले.◼️ तर २०२१-२२ मध्ये २,१८६ हजार टन उत्पादन मिळाले.◼️ यंदा तर ज्वारीचा उत्पादन खूपच घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.◼️ गोरगरीब कष्टकऱ्यांची भाकरी मात्र आता महाग झाली आहे.

इंदापूर येथील भुसार मार्केटमध्ये गुरुवारी (दि.२६) नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. जयसिंग पाटील यांच्या आडतवर खूनसावळे येथील शेतकऱ्यांची ३५ क्विंटल ज्वारीला प्रतिक्विंटल रु. ६००१ असा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक १५० क्विंटल झाली होती. उघड लिलावाने विक्री, चोख वजन, विक्रीनंतर शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाते. - आप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती

ज्वारीला तृणधान्यातील उपयोगी आरोग्यदायी धान्य मानले जाते. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहेत. 'ब' जीवनसत्त्वे भरपूर असल्याने शरीराला नैसर्गिक आणि दीर्घकाळ ऊर्जा मिळते, वजन नियंत्रणात राहते. लोह, अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. लोह रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवते, अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. - डॉ. शिल्पा खारतुडे-वायसे, आयुर्वेदतज्ज्ञ

अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

English
हिंदी सारांश
Web Title : Sorghum bread to become expensive due to low production, high prices.

Web Summary : Sorghum prices surge due to reduced production. Maldaandi sorghum reaches ₹6000/quintal. Retail prices hit ₹70/kg. Farmers benefit, but consumers face higher costs. Area under cultivation decreased, further impacting production and prices. Sorghum is considered a healthy grain rich in nutrients.
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीइंदापूरपेरणी