Join us

कृषी पणन मंडळाच्या योजना व उपक्रमांच्या माहितीसाठी सुरु झाली 'ही' मोफत ऑनलाईन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:01 IST

राज्यातील बाजार समित्यांची दैनिक आवक व बाजारभाव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना राज्यातील व देशातील शेतमालांचे बाजारभाव समजल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्यास मदत होत आहे.

राज्यातील बाजार समित्यांची दैनिक आवक व बाजारभाव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना राज्यातील व देशातील शेतमालांचे बाजारभाव समजल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्यास मदत होत आहे.

यासाठी कृषि पणन मंडळाचे मोबाईल अ‍ॅप MSAMB या नावाने गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅप स्टोअरवर मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामुल्य उपलब्ध आहे.

सदरील मोबाईल अ‍ॅपमध्ये समाविष्ट बाबी◼️ सदर अ‍ॅपवर पणन मंडळामार्फत राबविले जाणारे योजना, प्रकल्प व उपक्रम.◼️ राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव.◼️ भौगोलिक मानांकन नोंदणी कक्ष.◼️ कृषि पणन मित्र मासिक.◼️ राज्यातील बाजार समित्यांबाबत संक्षिप्त माहिती बाजार समिती प्रोफाईल.◼️ हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स.◼️ तळेगाव दाभाडे, पुणे येथील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग कोर्सेस.◼️ शेतमालाची विक्री अथवा खरेदी करण्यासाठी शेतमाल विक्रेता व खरेदीदार.◼️ राज्यातील बाजार समित्यांना दैनिक आवक व बाजारभाव भरण्याची सुविधा यांची माहिती इ. उपलब्ध आहे.

अ‍ॅपवरील दैनिक आवक व बाजारभाव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना राज्यातील व देशातील शेतमालांचे बाजारभाव समजल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा: शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू

टॅग्स :मार्केट यार्डबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसरकारराज्य सरकारपुणेमोबाइलऑनलाइन