शहापूर : बाजारात साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळूनही आणखी वाढ होईल, या अपेक्षेने तुरीची विक्री रोखून धरलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसला आहे.
गेल्या महिनाभरात तुरीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिले, मात्र सध्या दरात सुमारे ६५० ते ७५० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
बाजारातील अनिश्चितता, आयात-निर्यात धोरणातील बदल आणि आवक वाढ यांचा एकत्रित परिणाम तुरीच्या दरावर होत आहे.
बाजारातील अनिश्चिततेचा फटका◼️ देशांतर्गत आवक वाढणे, केंद्र सरकारकडून आयात धोरणातील सवलती, तसेच मोठ्या व्यापाऱ्यांची सावध खरेदी धोरणे यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.◼️ दरातील चढ-उतारामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने विक्री रोखली◼️ जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुरीला ८,३०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आगामी काळात दर ९ हजारांच्या पुढे जातील, अशी चर्चा होती.◼️ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल गोदामात साठवून ठेवत विक्री थांबविली; परंतु अपेक्षित वाढ न झाल्याने आता साठविलेला माल कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.
क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा◼️ सध्या बाजारात तुरीचा दर ७,७०० ते ७,८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे.◼️ महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या तुलनेत सरासरी ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.◼️ वाहतूक, साठवण आणि व्याज खर्च यामुळे प्रत्यक्ष नुकसान आणखी वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
आठवडाभरातील तुरीचे दर◼️ स्थानिक : ८,५०० - ८,२०० - ७,८००◼️ लाल : ८,४०० - ८,१०० - ७,७५०◼️ पिवळी : ८,३०० - ८,०५० - ७,७००
तुरीच्या भावात सातत्याने बदल का होतात?◼️ उत्पादनाचा अंदाज आणि प्रत्यक्ष आवक यात फरक.◼️ आयात निर्णय व साठा धोरण.◼️ बाजार समित्यांमधील लिलावातील स्पर्धा.◼️ हवामानाचा परिणाम व साठवण क्षमता.◼️ सट्टेबाजीची मानसिकता.◼️ महिनाभरात बदलत गेला भाव.
भाव वाढणार की आणखी पडणार?◼️ तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात आवक कायम असल्याने दरात मोठी वाढ तातडीने अपेक्षित नाही.◼️ मात्र, सरकारी खरेदी किंवा निर्यात धोरणात बदल झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते.◼️ आगामी दोन आठवडे निर्णायक ठरणार असल्याचे व्यापारी सांगतात.
बाजारात सध्या मालाची आवक वाढली आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. - रामशेठ अग्रवाल, व्यापारी
दर आणखी वाढतील, या आशेने माल रोखून धरला; पण आता ७०० रुपयांनी दर घसरल्याने नुकसान झाले. साठवण खर्च वेगळा. - दीपक बैनाडे, शेतकरी
दरातील चढ-उतारामुळे नियोजन करणे कठीण झाले आहे. सरकारने किमान हमीभावावर प्रभावी खरेदी करावी. - सखाराम गावीत, शेतकरी
अधिक वाचा: जमिनीला आलाय सोन्याचा भाव; शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा का वाढतोय कल? वाचा सविस्तर
Web Summary : Tur prices fluctuate due to policy changes and increased supply. Farmers face losses as prices drop from ₹8,500 to ₹7,800 per quintal. Experts advise caution, awaiting policy shifts for potential price recovery. Traders urge informed decisions.
Web Summary : नीतिगत बदलाव और आपूर्ति बढ़ने से तुअर की कीमतों में उतार-चढ़ाव। किसानों को 8,500 रुपये से गिरकर 7,800 रुपये प्रति क्विंटल होने से नुकसान। विशेषज्ञों ने संभावित मूल्य सुधार के लिए नीतिगत बदलावों का इंतजार करने की सलाह दी। व्यापारियों ने सूचित निर्णय लेने का आग्रह किया।