Lokmat Agro >बाजारहाट > Tamarind Tree : चिंचेच्या झाड सावलीसह देते हजारो रुपयांचे उत्पादन

Tamarind Tree : चिंचेच्या झाड सावलीसह देते हजारो रुपयांचे उत्पादन

Tamarind Tree: Tamarind tree provides shade and yields worth thousands of rupees | Tamarind Tree : चिंचेच्या झाड सावलीसह देते हजारो रुपयांचे उत्पादन

Tamarind Tree : चिंचेच्या झाड सावलीसह देते हजारो रुपयांचे उत्पादन

Tamarind Tree : बांधावर लावलेल्या चिंचेच्या झाडाकडून आता केवळ छायाच मिळत नाही, तर एक चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. वाचा सविस्तर (Tamarind Tree)

Tamarind Tree : बांधावर लावलेल्या चिंचेच्या झाडाकडून आता केवळ छायाच मिळत नाही, तर एक चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. वाचा सविस्तर (Tamarind Tree)

शेअर :

Join us
Join usNext

बांधावर लावलेल्या चिंचेच्या झाडाकडून आता केवळ छायाच मिळत नाही, तर एक चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर चिंचेचे झाड लावलेले आहे. या झाडांना आता मोठ्या प्रमाणात चिंचा लगडलेल्या आहेत. (Tamarind Tree)

एक झाड १ ते २ क्विंटल चिंचाचे उत्पादन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान २० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न एका झाडापासून मिळत आहे.
बाजारात किरकोळ विक्री करणाऱ्यांना जास्त भाव मिळत आहेत. एक झाड चांगले उत्पन्न देत आहे.  (Tamarind Tree)

एका झाडाचे २० हजारांवर उत्पन्न

चिंचेच्या झाडाला एका हंगामात १ ते २ क्विंटल चिंच उत्पादन होते. बाजारात प्रति किलो १०० रुपये दर मिळत आहे. व्यापारी तसेच पाणीपुरी विक्रेते थेट शेतातून चिंच खरेदी करत आहेत. त्यामुळे चांगले दर मिळत आहेत.  (Tamarind Tree)

एका झाडाला किती चिंचा ?

झाडाचा आकार व वयोमानानुसार ३० किलोपासून ते २ क्विंटलपर्यंत एक झाड चिंचेचे उत्पादन देत आहे. चिंचेच्या झाडाला पाणी व्यवस्थापन, खतांची योग्य मात्रा व इतर कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला, तर उत्पादनात वाढ होऊ शकते.  (Tamarind Tree)

एका हंगामात शेतकऱ्याला कोणत्याही उत्पादन खर्चाशिवाय हमखास १ ते १.५ क्विंटल चिंच मिळते. चिंचाच्या झाडाच्या छायेत इतर पिकांचीही वाढ होऊ शकते.

चिंचेचे झाड लागवड ठरतेय फायद्याची!

शेतकऱ्यांसाठी चिंच एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरू शकते. चिंचेच्या झाडांचा उपयोग केवळ सावलीसाठीच नाही तर त्यापासून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवता येते. झाडांपासून वर्षभरात २० हजारांवर उत्पन्न मिळवता येते.  (Tamarind Tree)

कशात होतो वापर ?

चिंच एक बहुपयोगी फळ आहे. विविध खाद्यपदार्थांमध्ये तिचा उपयोग केला जातो. चिंच मुख्यतः अन्नात, मसाल्यांमध्ये, चटणी, सूप, आमटी, वडी आदीमध्ये वापरली जाते.  (Tamarind Tree)

चिंचेच्या गोडसर आणि आमसुलतेच्या चवीमुळे विविध पदार्थाना एक वेगळीच चव मिळते. चिंच चहा, सरबत किंवा लोणच्याचे मुख्य घटक असते. चिंचेच्या घटकांचा वापर काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.

चिंचा काय किलो?

चिंचेला ६० ते १०० रुपये किलो भाव मिळत आहे. पाणीपुरी विक्रेते थेट शेतातून ठोक स्वरुपात शेतकऱ्यांकडून चिंचा घेत आहेत. झाडाला लगडलेल्या चिंचा बघून त्याचा सौदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडाच्या चिंचा तोडून बाजारात नेण्याचीही आवश्यकता भासत नाही. शेतातच चिंचाची विक्री होत आहे.  (Tamarind Tree)

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

Web Title: Tamarind Tree: Tamarind tree provides shade and yields worth thousands of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.