Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रसिद्ध सुप्याच्या बाजारात चिंच लिलावाला सुरवात; प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:17 IST

chinch bajar bhav चालू चिंच हंगामाला प्रारंभ झाला असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चिंच लिलावाचा प्रारंभ शनिवारी (दि. १४) सुपे उपबाजार येथे होणार आहे.

बारामती : चालू चिंच हंगामाला प्रारंभ झाला असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चिंच लिलावाचा प्रारंभ शनिवारी (दि. १४) सुपे उपबाजार येथे होणार आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे उपबाजारातील चिंच लिलाव राज्यात प्रसिद्ध आहे. या वर्षी चिंचेसाठी वातावरण पोषक असल्यामुळे आवक चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.

तरी शेतकऱ्यांनी आपली चिंच स्वच्छ, वाळवून पॅकिंगमध्ये आणावी, असे आवाहन सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे.

सुपे उपबाजार आवारात गतवर्षी एकूण ३८,००० पोत्यांची चिंचेची आवक झाली होती आणि चिंचेस प्रतिक्विंटल रु. ७,००० असा उच्चांकी दर मिळाला होता. तर किमान दर रु. २५०० होता.

फोडलेल्या चिंचेस प्रतिक्विंटल कमाल दर रु. १३,००० आणि सरासरी दर प्रतिक्विंटल रु. १०,००० मिळाला होता. बारामती तालुक्यातील तसेच शिरूर, दौंड, पुरंदर, फलटण, श्रीगोंदा, इंदापूर, भोर तालुक्यांतून चिंचा विक्रीसाठी येत असतात.

सुपे उपबाजारात चिंचेचे लिलाव दर शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होतील. शेतमालाचे वजनमाप इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर लिलावापूर्वी होत असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tamarind Auction Starts in Famous Supe Market; Price Per Quintal?

Web Summary : Tamarind auction begins at Supe market. High yields expected due to favorable weather. Last year, prices reached ₹7,000/quintal, peaking at ₹13,000 for processed tamarind. Auctions start Saturday at 11 AM with electronic weighing.
टॅग्स :शेतकरीशेतीबाजारफळेपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबारामती