Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sweet Potato : रताळी खरेदी हंगाम सुरू प्रतिकिलो कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:07 IST

रताळी काढणीच्या हंगामात सुरू झालेला खरेदी-विक्री सौदा शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल, असा विश्वास बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला.

मलकापूर : रताळी काढणीच्या हंगामात सुरू झालेला खरेदी-विक्री सौदा शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल, असा विश्वास बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरच्या उपबाजार समितीच्यावतीने मलकापूर येथे रताळी खरेदी-विक्रीचा प्रारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, १४१ पोत्यांची आवक झाली होती.

प्रारंभीच्या रताळी सौद्याची बोली ३२ रुपये प्रतिकिलो दराने झाली. पहिला सौदा दादासो यादव यांनी जाहीर केला. यावेळी अमर खोत, महादेव पाटील, दादासो बारगीर, जयवंत पाटील, भरत पाटील, शंकर पाटील, आदी उपस्थित होते.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डकोल्हापूरशेतकरीशेतीपीकपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती