संजय लव्हाडे
जालना : केंद्र सरकारने फेब्रुवारीचा साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर करताच बाजारात साखरेच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोयाबीनची मुदतवाढ तिसऱ्यांदा ६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्याचबरोबर तुरीच्या नोंदणी ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तूर, हरभरा, मका यामध्ये मंदी असली तरी सोन्याने मात्र आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारीचा साखर कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर केल्यानंतर १ फेब्रुवारी रोजी साखरेच्या भावाने उच्चांक गाठला आहे. बहुतांश कारखान्यांनी आपल्या पहिल्या आठवड्याचा माल विकून टाकला आहे.
त्यामुळे यापुढेही साखरेमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. साखरेचे भाव ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल पोहोचला असून, साखरेच्या दरात आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
यावर्षात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन निघाले असून, 'नाफेड'च्या वतीने सोयाबीन खरेदीला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीस १२ जानेवारी, त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र, केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा कायम असल्याने पणन विभागाच्या मागणीस मंजुरी देत केंद्र सरकारने ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली. या मुदतवाढीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांक
• १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या किमतीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
• केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास आधीच २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ८३ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.
बाजारभाव (प्रतिक्विंटल)
गहू - २७०० ते ४५०० रुपयेज्वारी - २१०० ते ३४०० रुपयेबाजरी - २१५० ते ३००० रुपयेमका - १६७५ ते २२०० रुपयेतूर - ६४०० ते ७४०० रुपयेहरभरा - ४५०० ते ५७०० रुपयेसोयाबीन - ३००० ते ४७०० रुपयेपामतेल - १४३०० रुपयेसूर्यफूल तेल - १४००० रुपयेसरकी तेल - १३२०० रुपयेसोयाबीन तेल - १३३०० रुपयेकरडी तेल - २०००० रुपये