परभणी : जिल्ह्यात १२ खरेदी केंद्राकडे २१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देऊनही केंद्राची खरेदी गती मात्र वाढताना दिसून येत नाही.
दिलेल्या मुदतीत दिवसाकाठी आता दीड हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी (CCI Center) करावे लागणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.
शेतमालाला बाजारपेठेत ४ हजार प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. जो की उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक क्विंटलला दहा हजार रुपयांचा खर्च येतो.
शासनाने कोणत्या आधारावर ४ हजार ८९२ रुपयांचा हमीभाव दिला. हे मात्र कळेनासे झाले आहे, तर दुसरीकडे या केंद्रांवर २१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत ४ हजार ३११ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. आता उरलेल्या ३१ जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवसासाठी दीड हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन या केंद्रांना खरेदी करावे लागणार आहे.
परभणी | ७६६३ |
जिंतूर | ४१५९ |
सेलू | १४६४९ |
मानवत | ५४४३ |
पाथरी | ५१९० |
पूर्णा | ८०६२ |
सोनपेठ | १९२६६ |
बोरी | ७५५५ |
पेडगाव | १०८५० |
वरपूड | १०४९ |
रुढीपाटी | ५२४७ |
केवळ ८९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी
* परभणी जिल्ह्यातील बारा खरेदी केंद्राकडून आतापर्यंत ८९ हजार २८ क्विंटल सोयाबीनचे खरेदी केले. अद्यापही १७ हजार ३१६ शेतकरी सोयाबीन खरेदी करण्यापासून वंचित आहेत.
* या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जानेवारीपर्यंत आपले सोयाबीन केंद्राकडे विक्री करावे लागणार आहे. मात्र, या केंद्राकडून संथगतीने खरेदी सुरू असल्याने सोयाबीन उत्पादकांतून संताप व्यक्त होत आहे.
* २१ हजार ६२८ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) केली आहे.
* १२ खरेदी केंद्रांकडून आता ३१ जानेवारीपर्यंत गती वाढवून उर्वरित १७ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीचे आव्हान आहे.