lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन, तुरीचे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतमाल अजून किती दिवस घरातच ठेवायचा?

सोयाबीन, तुरीचे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतमाल अजून किती दिवस घरातच ठेवायचा?

Soybean, pigeon pea farmers concern increased, how many more days to keep the agricultural produce at home? | सोयाबीन, तुरीचे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतमाल अजून किती दिवस घरातच ठेवायचा?

सोयाबीन, तुरीचे उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतमाल अजून किती दिवस घरातच ठेवायचा?

८०० रुपयांनी तूर घसरली, सोयाबीनची ही घसरण सूरुच

८०० रुपयांनी तूर घसरली, सोयाबीनची ही घसरण सूरुच

शेअर :

Join us
Join usNext

१५ दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. सरासरी ४३०० रुपये भाव असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. २०२३च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले.

गारपीट व अवकाळी पावसामुळे तूर पिकालाही फटका बसला होता. नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजार समित्यांत दाखल झाल्यानंतर सुरुवातीला ४४०० ते ५१०० या दरम्यान भाव मिळाला मध्यंतरी सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५४०० रुपये भाव मिळाला होता. १४ एप्रिलपर्यंत पाच हजारांपर्यंत भाव मिळाला. आता पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण सुरु झाल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात किमान ४२०० ते कमाल ४५०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

८०० रुपयाने तूर घसरली

१५ दिवसांपूर्वी तुरीला प्रतिक्चिटल कमाल १२,५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. आता कमाल ११,७०० रुपये असा भाव मिळत आहे. जवळपास प्रतिक्विंटल ८०० रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

लागवड खर्चात भरमसाठ वाढ होत असल्याने लागवड खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळायलाच हवा. मात्र, शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली जात नसल्याने मातीमोल भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. - सखदेव वानखडे, शेतकरी, चिखली, ता. रिसोड, जि. वाशिम

हेही वाचा - शेळीपालनातून आधुनिक स्मार्ट पद्धतीने अधिकचा नफा मिळविण्याचे तीन मार्ग

 

Web Title: Soybean, pigeon pea farmers concern increased, how many more days to keep the agricultural produce at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.