Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध!

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध!

Soybean Market: Obstacles in soybean purchase removed; Bardana available! | Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध!

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध!

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर झाल्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर झाल्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चिखली : महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने राज्यात शासनाच्या अधिकृत केंद्रांत सोयाबीनची(Soybean) खरेदी सुरू आहे, परंतू गेल्या काही दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे सोयाबीन खरेदी(purchase) खोळंबली होती.परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर(Farmers) ताटकळण्याची वेळ आली होती.

शेतकऱ्यांची अडचण पाहता आमदार श्वेता महाले यांनी नाफेड(NFFD) व राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला. त्याची फलनिष्पत्ती म्हणून राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रांवर बारदाना(Bardana) उपलब्ध केला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सध्या राज्य शासनाकडून राज्यात सोयाबीनची खरेदी शासनाच्या अधिकृत केंद्रामार्फत केली जात आहे. या ठिकाणी नाफेड मार्फत बारदाना उपलब्ध करून दिला जातो. परंतु, ज्या बारदाना पुरवठादार कंपनीशी नाफेडचा करार होता; त्या कंपनीकडून अद्याप बारदान्याचा पुरवठा न झाल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रांत बारदाना टंचाई निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनची खरेदी खोळंबून शेतकरी वर्ग देखील अडचणीत आला होता.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही बाब आमदार श्वेता महाले(Shweta Mahale) यांना कळविली असता त्यांनी तातडीने नाफेड आणि राज्य शासनाच्या संबंधित हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आलेला शेतमाल अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क करून शेतकऱ्यांची व्यथा सांगितली.

लवकरात लवकर या समस्येचे निवारण करण्याबाबत सांगितले. पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून तातडीने सोयाबीन खरेदी केंद्रांत आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून देण्यासंबंधी हालचाली करण्यात आल्या आहेत. ४ जानेवारीपासून तालुक्यातील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रांत पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध होणार असल्याने सोयाबीनची खरेदी आता पूर्ववत सुरू होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : NCCF Center : १५ शासकीय केंद्रांवर सोयाबीन खरेदी ठप्प; 'एनसीसीएफ' केंद्रांवरील बारदाणा संपला

Web Title: Soybean Market: Obstacles in soybean purchase removed; Bardana available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.