Join us

लातूर बाजार समितीत सोयाबीन आणि राजमा आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:35 IST

Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे.

दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यात सर्वाधिक पसंतीची भाजी म्हणून ओळख असलेल्या राजमा पिकाला मराठवाड्यात शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे.

सध्या राजमाची आवक लातूरच्याबाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनचा हमीभावापर्यंतही दर पोहोचला नाही, आधारभूत किमतीपेक्षा क्विंटलमागे जवळपास ८०० रुपर्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शनिवारी सोयाबीनची आवक १० हजार ४४१ क्विंटल झाली होती. किमान दर ३ हजार ८२५ रुपये तर कमाल भाव ४ हजार ३११ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

राजमा हे पीक प्रामुख्याने पंजाब प्रांतात घेतले जाते. कमी दिवसात, कमी पाण्यातर येणारे हे पीक त्या भागात लोकप्रिय आहे. राजमा आणि भात हा खाद्यपदार्थही प्रसिध्द आहे. मराठवाड्यातही काही शेतकरी मागील काही वर्षांपासून पेरणी करीत आहेत. लातूर तालुक्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी राजमा शेतीचा प्रयोग केला आहे. दर चांगला मिळत असल्याने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

खरिपातील सोयाबीन

लातूरच्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनला सध्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रति क्विंटल ४१३० रुपये सरासरी दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

राजमाला चांगला भाव

लातूरच्या बाजारात राजमाची खरेदी सुरू झाली आहे. प्रतिक्विंटल २ हजार ७०० रूपये भाव मिळत आहे. दरवर्षी राजमाला सरासरी असाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला.

४८० क्विंटलची आवक...

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी राजमाची आवक जवळपास ५०० क्विंटलवर झाली आहे. दिवसेंदिवस राजमाची आवक वाढत आहे.

तुरीची आवक ३ हजार २८२ क्विंटल

तुरीची आवक ३ हजार २८२ क्विंटल होऊन साधारण दर ७ हजार ४८० रुपये मिळाला. कमाल भाथ ७ हजार ५८८ तर किमान भाव ७ हजार ४०० रुपये राहिला. राजमाची आवक ४८० क्विंटल होऊन कमाल भाव १ हजार ७०० रुपये होता.

हेही वाचा : बाजारात वर्षभर मागणी असलेल्या 'या' उत्पादनाची करा निर्मिती; बाजरीचे मूल्यवर्धन होऊन उपलब्ध होतील रोजगार संधी

टॅग्स :बाजारशेतकरीलातूरसोयाबीनमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्रमराठवाडा