Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीच्या उत्पादनात घट, दरात मात्र दुपटीने वाढ; वाचा शाळू ज्वारीला प्रतिक्विंटल काय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:03 IST

सध्या शाळूची मळणी नुकतीच होऊन नवे धान्य शेतकऱ्यांच्या घरात येऊ लागले आहे, त्यामुळे सध्या घरगुती शाळू प्रतिकिलो चंगला भाव मिळत आहे.

शाळू ज्वारीचे दर ४० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. उत्पादनातील घट आणि मागणीतील वाढ यामुळे शाळूचा दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

सध्या शाळूची मळणी नुकतीच होऊन नवे धान्य शेतकऱ्यांच्या घरात येऊ लागले आहे, त्यामुळे सध्या हा घरगुती शाळू ४० रुपये प्रतिकिलो या भावाने उपलब्ध आहे.

सप्टेंबर महिन्यानंतर दोन-तीनच चांगले पाऊस झाले. त्यामुळे शाळूच्या पेरणीला उशीर झाला. त्यामुळे शाळूचे उत्पादन सर्वत्र घटले आहे.

पावसाळी शाळू गोडपावसाच्या पाण्यावर व थंड हवेच्या जोरावर आलेली शाळू चवीला गोड असते, शिवाय भाकरीही मऊ आणि पांढऱ्या शुभ्र होतात.

घरगुती बियाण्याचाच वापरअनेक शेतकरी शाळू पेरताना घरगुती बियाणे अधिक प्रमाणात वापरतात, त्यामुळे शाळू आरोग्यदायी आणि रसायनविरहित असते.

सध्या दर ४० रुपयेसध्या शेतकऱ्यांकडे मिळणारी नव्या हंगामातील घरगुती शाळू सरासरी ४० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.

बाजारात ५० रुपयेबाजारात ५० रुपये प्रतिकिलो या दराने शालू मिळत आहे. त्यातही वेगवेगळ्या जातीच्या शाळूची भेसळ आहे.

६० रुपयांवर जाणार?शाळूचा प्रतिकिलो भाव ६० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने दरवाढीची चिन्हे आहेत.

आताच घेऊन ठेवाशाळूचे दर आटोक्यात असल्याने वर्षभराच्या खाण्यासाठी शाळूची आताच घाऊक खरेदी करून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे.

कडबा ३००० रुपयांपर्यंत◼️ यंदा शाळूचे उत्पादन घटल्याने कडबाही चांगलाचा महागेला आहे.◼️ चांगल्या प्रतीचा कडबा आता शेकडा २७०० ते ३००० रुपयांना विकला जात आहे. जनावरांसाठी शेतकरी खरेदी करत आहे.

उत्पादनातही उतरता आलेख◼️ वर्ष २०००-०१ मध्ये ३९८८ हजार टन उत्पादन झाले होते.◼️ वर्ष २०११-१२ मध्ये ३४५२ हजार टन मिळाले.◼️ तर २०२१-२२ मध्ये २१८६ हजार टन उत्पादन मिळाले.◼️ यंदा ज्वारीचे उत्पादन घटल्याचा अंदाज आहे.◼️ गतवर्षी राज्यात सर्वत्र उत्पादन कमी झाले आहे.◼️ यामुळे यावर्षी जानेवारीमध्येच तुटवडा निर्माण झाला आहे.

अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Sorghum Production Drops, Prices Double: What's the Rate Per Quintal?

Web Summary : Sorghum prices surge due to reduced production and increased demand, reaching ₹40/kg. Delayed planting caused lower yields. Farmers using homegrown seeds ensures quality. Prices may hit ₹60/kg; bulk buying advised. Fodder prices also rise. Sorghum production is declining over the years.
टॅग्स :ज्वारीसांगलीशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डकाढणी