Lokmat Agro >बाजारहाट > Shetmal Bajar Bhav: सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर

Shetmal Bajar Bhav: सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर

Shetmal Bajar Bhav: latest news Who will bear the price hike of soybeans and Harbhara? Read in detail | Shetmal Bajar Bhav: सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर

Shetmal Bajar Bhav: सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर

Shetmal Bajar Bhav: शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybeans Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल ते वाचा सविस्तर.

Shetmal Bajar Bhav: शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybeans Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल ते वाचा सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Shetmal Bajar Bhav : शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybean, Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी अडचणींमुळे यापूर्वीच शेतमालाची(Shetmal) विक्री केल्याने त्यांचे नुकसान झाले. आता झालेली दरवाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अलीकडच्या तीन वर्षात सोयाबीनचे (Soybean) सरासरी उत्पन्न घटले. त्यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतमाल यापूर्वीच विकला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

हंगामात पहिल्यांदा हरभरा 'एमएसपी'पार

यावर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५,६५० रुपये क्विंटल असताना मार्केटमध्ये ५,३०० रुपयांवर दर स्थिरावले होते. या चार दिवसांत मागणी वाढल्याने हरभऱ्याचे दर ५,८०० ते ६ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा असल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याची साठवणूक करीत आहेत. (MSP)

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

खरीप पेरणीच्या तोंडावर मे व जूनमध्ये तसेच रब्बी पेरणीपूर्वी म्हणजेच दिवाळीच्या कालावधीत दरवाढ होण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याची साठवणूक करीत आहेत. शासन हमीभाव केंद्रांपेक्षा (नाफेड) जास्त दर असल्याने हरभऱ्याची नोंदणीदेखील अत्यल्प आहे.

उन्हाळ्यात काही प्रमाणात दरवाढ झालेली आहे. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे. जास्त दरवाढीची यंदा शक्यता नाही. - संजय राठी, व्यापारी

सोयाबीनचे बाजारभाव (रु./क्विं.)

२६ मार्च३८५० ते ४१४७
२८ मार्च४०५० ते ४२००
०२ एप्रिल४२५० ते ४४००
०४ एप्रिल४२५० ते ४३७०
०७ एप्रिल४००० ते ४१५०
०८ एप्रिल४०५० ते ४२२५

हे ही वाचा सविस्तर : Halad Bajar Bhav: हळदीच्या दरात सुधारणा; बाजारात प्रतिक्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

Web Title: Shetmal Bajar Bhav: latest news Who will bear the price hike of soybeans and Harbhara? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.