Join us

एनसीसीएफच्या कांदा खरेदीला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:15 IST

कांदा मार्केटचा व्यवहार पूर्वपदावर

एनसीसीएफने उन्हाळ कांदा खरेदी सुरू केल्याने झोडगे व चंदनपुरी, मुंगसे येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी दिवसभरात किमान ३० ते ४० हजार क्विंटल कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. पंधरा दिवसांपासून व्यापारी संपावर गेल्यामुळे कांदा मार्केटचा व्यवहार ठप्प होता.त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून येत होते. परंतु, पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर मंगळवारपासून संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून कांदा मार्केटचा व्यवहार पूर्वपदावर आला आहे. बंदच्या काळात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब, डाग किंवा दोन महिने चाळीत न ठेवता येणारा कांदा व्यापाऱ्यांकडून नाकारला जात आहे. परंतु असा कांदा बहुसंख्य शेतकरी मार्केटला आणत नसल्याचे सांगण्यात आले.

नाफेडच्या दरानुसार भावकांद्याला भाव जाहीर करण्याचे अधिकारी नाफेडला असल्याने दादिवसाला भाव जाहीर केला जातो. भाव जाहीर झाल्याची माहिती फलकावर लावली जाते. त्यानुसार, शेतकऱ्यांना कांद्याला भाव दिला जातो. गेल्या शुक्रवारी कांद्याला २ हजार ३७० रुपये भाव आला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :कांदाशेतकरीबाजारमार्केट यार्ड