कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा (जि. जळगाव) येथे रब्बी हंगामातील हरभरा, मका, तूर, नवीन गहू व दादर या धान्यांची आवक लक्षणीयरित्या वाढली आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टरमधून जिल्हाभरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत.
भारतीय बाजारातील धान्याच्या निर्यातीची प्रक्रिया सध्या बंद असल्याने मालाला अपेक्षित उठाव मिळत नाही. परिणामी, भावात घसरण झाल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत चोपडा येथे दर काही प्रमाणात जास्त असले, तरी मागील वर्षाच्या तुलनेत भाव कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
अमळनेर, धरणगाव, यावल, रावेर, जळगाव तालुका, तसेच तापी नदीकाठची गावे आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शेतकरीही चोपडा बाजारात माल मोठ्या प्रमाणात आणतात.
दिल्ली व मध्य प्रदेशातील व्यापारी येथे खरेदीसाठी येत असले, तरी निर्यात प्रक्रिया बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मागील वर्षीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे नव्या मालाला अपेक्षित मागणी मिळत आहे.
शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी गोडाऊन सुविधा, मालवाहतुकीसाठी प्रशस्त जागा, लिलावाच्या दरम्यान दोन वेळा चहा व शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकरी निवारा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चोपड्यात शेतकरी उशिरा माल घेऊन आला, तरी रात्री १० वाजेपर्यंत मालाची मोजणी करून लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे जिल्हाभरातूनच नव्हे तर धुळे जिल्ह्यातूनही चोपडा बाजार समितीत धान्याची आवक होते. - नरेंद्र पाटील, सभापती, बाजार समिती.
पीक निहाय दर
| पिक | किमान दर | कमाल दर |
| चापा हरभरा | ५,१५० | ५,२७६ |
| व्ही-टू हरभरा | ५,५०० | ५,६७५ |
| गुलाबी हरभरा | ४,९७५ | ५,३५६ |
| डॉलर चना | ८,०५१ | ८,४०० |
| तूर | ७,५०० | ८,५०० |
| नवीन गहू | २,२५० | २,३६६ |
| दादर | ३,००१ | ३,६२५ |
| मका | १,४०० | १,४९५ |
चोपडा बाजार समितीत अडत घेतली जात नाही..
चोपडा बाजार समितीत शेतकऱ्यांकडून अडत घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा चोपड़ा बाजार समितीकडे ओढा आहे. व्यापाऱ्यांकडून केवळ १.५ टक्के मार्केट फी आकारून त्यातून शासनाचा कर भरला जातो.
जळगाव जिल्ह्यासह धुळ्यातूनही चोपडा बाजार समितीत आवक
१५९५ रूपये असा यंदाचा मका खरेदीचा शासकीय दर आहे. दादर ३ हजार ६२७तर तूर २ हजार ३६६ रूपये या दराने खरेदी केली जात आहे. चोपडधात सध्या आयक वाढली आहे.
Web Summary : Chopda market sees high arrivals of chickpeas, maize, tur, wheat, and sorghum. Despite better rates than other markets, farmers worry as prices are lower than last year due to export issues. The market offers good facilities to farmers.
Web Summary : चोपडा बाजार में चना, मक्का, तुअर, गेहूं और ज्वार की भारी आवक हो रही है। अन्य बाजारों की तुलना में बेहतर दरें होने के बावजूद, किसान चिंतित हैं क्योंकि निर्यात समस्याओं के कारण कीमतें पिछले वर्ष की तुलना में कम हैं। बाजार किसानों को अच्छी सुविधाएँ प्रदान करता है।