सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राजापुरी हळदीची १० हजार ९८७ पोत्यांची आवक झाल्याने बाजारपेठ गजबजली आहे.
हळदीच्या विविध प्रकारांना समाधानकारक ते तेजीत दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
राजापुरी चोरा हळदीला प्रति क्विंटल ४० हजार रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. दर्जानुसार दरात तफावत असून, उत्कृष्ट गुणवत्तेला उच्चांकी भाव मिळत आहे.
राजापुरी हळदीच्या कनी (सेलम) प्रकाराला प्रति क्विंटल १३,००० ते १५,००० रुपये दर मिळाला. पावडर गुणवत्ता (सेलम) प्रकाराला १५,२०० ते १७,००० रुपये दर मिळाल्याने या प्रकाराला चांगली मागणी आहे.
लगडी प्रकाराने बाजारात आघाडी घेत १८,००० ते २३,७०० रुपये असा उच्चांकी दर गाठला. राजापुरी गठ्ठा (सेलम) प्रकाराला १३,००० ते १७,००० रुपये दर मिळाला, तर देसी कडप्पा प्रकार १३,००० ते १४,५०० रुपये दराने विकला गेला.
विशेष म्हणजे 'चोरा' या प्रकाराला सर्वाधिक दर मिळत असून, तो २५,००० ते ४०,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
हळदीचे दर (प्रति क्विंटल)◼️ राजापुरी कनी (सेलम) - १३,००० ते १५,०००◼️ राजापुरी पावडर गुणवत्ता (सेलम) - १५,२०० ते १७,०००◼️ राजापुरी लगडी - १८,००० ते २३,७००◼️ राजापुरी गठ्ठा (सेलम) - १३,००० ते १७,०००◼️ देसी कडप्पा - १३,००० ते १४,५००◼️ चोरा - २५,००० ते ४०,०००
निर्यात वाढल्याने दरात तेजी◼️ निर्यात मागणी आणि स्थानिक खरेदी यामुळे बाजारात तेजी कायम आहे.◼️ पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर्जेदार हळदीच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.◼️ राजापुरी चोरा हळद प्रकाराला सोमवारी हळद सौद्यात प्रति क्विंटल २५ हजार ते ४० हजार रुपये दर मिळाला आहे.◼️ अशी माहिती हळद व्यापारी व सांगली बाजार समितीचे संचालक कडप्पा वारद यांनी दिली.
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
Web Summary : Sangli market sees high prices for RajaPuri turmeric, especially 'Chora' variety, reaching ₹40,000/quintal. Increased exports drive the market. Lagdi turmeric sold for ₹23,700/quintal. Good quality turmeric is expected to maintain high prices.
Web Summary : सांगली बाजार में राजापुरी हल्दी, खासकर 'चोरा' किस्म की ऊंची कीमत, ₹40,000/क्विंटल तक पहुंची। निर्यात बढ़ने से बाजार में तेजी। लगदी हल्दी ₹23,700/क्विंटल में बिकी। अच्छी गुणवत्ता वाली हल्दी की ऊंची कीमत बने रहने की उम्मीद है।